झी न्यूजविरोधात महुआ मोईत्रांची बदनामीची तक्रार

झी न्यूजविरोधात महुआ मोईत्रांची बदनामीची तक्रार

नवी दिल्ली : झी टीव्हीचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांनी बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे. म

‘आयएनएक्स मीडियाची मालकी अंबानींकडे होती’
कोल्हापूर, सांगलीत महापूर : हजारो नागरिकांचे स्थलांतर
महाजन यांची ‘पूर’ टूर आणि वादग्रस्त जीआर

नवी दिल्ली : झी टीव्हीचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांनी बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे. महुआ मोईत्रा यांनी गेल्या महिन्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करताना मोदी सरकारच्या राजवटीत देशात फॅसिझम शिरत असल्याबद्दल चिंता व्यक्त करणारे भाषण केले होते. पण महुआ मोईत्रा यांनी आपले भाषण मार्टिन लाँगमन यांच्या एका लेखावरून चोरल्याचा आरोप सुधीर चौधरी यांनी आपल्या टीव्हीवरील कार्यक्रमात केला होता.

या आरोपानंतर देशभर गहजब उडाला होता. पण नंतर खुद्द मार्टिन लाँगमन यांनी ट्विटरवरच्या माध्यमातून महुआ मित्रा यांचे भाषण व आपला लेख याच्यात कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मोईत्रा यांची स्वतंत्र मते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

त्यात प्रसारमाध्यमांपुढे महुआ मोईत्रा यांनी आपल्या भाषणातले फॅसिझमचे मुद्दे अमेरिकेतील होलोकास्ट म्युझियममध्ये एक पोस्टर लावले आहे तेथून असल्याचेही स्पष्ट केले होते. तरीही त्यांच्यावरचे मुद्दे चोरल्याचे आरोप सुरूच होते.

सोमवारी दिल्लीतील शहर दिवाणी न्यायालयात चौधरी यांच्याविरोधातील फिर्याद नोंदवून घेण्यात आली. तसेच या प्रकरणाची पहिली सुनावणी २० जुलैला होईल असे न्या. प्रीती परेवा यांनी सांगितले. मोईत्रा यांचा जबाब त्याच दिवशी घेतला जाणार आहे.

सुधीर चौधरी यांच्या विरोधात हक्कभंगाचीही तक्रार

संसदेतल्या आपल्या भाषणावर टीका करणारा कार्यक्रम झी न्यूजवर प्रदर्शित झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी सुधीर चौधरी यांच्याविरोधात हक्कभंगाचीही तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारली असून त्यावर विचारविमर्श केला जाईल असे अध्यक्षांनी सांगितले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0