‘हिचकॉक’वरची पुस्तकं

‘हिचकॉक’वरची पुस्तकं

इंग्रजी साहित्यात शेक्सपियर आणि डिकन्स यांना जे स्थान आहे तसं स्थान आता चित्रपटाच्या प्रांतात हिचकॉकला दिलं जातंय.

मास्क नसल्याने पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू
काँग्रेसमधला पत्रप्रपंच कशासाठी?
वुई आर सॉरी!

सस्पेन्सचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉकनं (१८९९-१९८०) ५३ चित्रपट आणि २० टीव्ही शोज आणि एक डॉक्युमेंटरी केली.

आल्फ्रेड हिचकॉक आणि त्याचे सिनेमे यावर २०३ पेक्षा अधिक पुस्तकं लिहिली गेली आहेत. अजूनही त्याच्या चित्रपटांचे नवनवे अर्थ काढणं थांबलेलं नाहीये, नवी पुस्तकं समीक्षक लिहिताहेत.

इंग्रजी साहित्यात शेक्सपियर आणि डिकन्स यांना जे स्थान आहे तसं स्थान आता चित्रपटाच्या प्रांतात हिचकॉकला दिलं जातंय.

हिचकॉकची चित्रपट कारकीर्द १९२५ पासून सुरु झाली तेव्हापासून त्याच्या चित्रपटावर समीक्षणं लिहिली जात होती, खरपूस टीकाही होत असे. परंतू एकूणातच चित्रपटाला सहित्याचा दर्जा दिला जात नसल्यानं पुस्तकं लिहिली जात नसत. चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन, त्यात जीवनविषयक तत्वज्ञान वगैरे नसतं असं लोकं म्हणत असत. पुस्तकं म्हणजे ग्रेट, सिनेमा म्हणजे दुय्यम दर्जाचं काही तरी असं लोक म्हणत.

हिचकॉकवर क्लोद शाब्रोल आणि एरिक रोमर यांनी हिचकॉक या शीर्षकाचं पहिलं पुस्तक १९५७ साली लिहिलं. दोघेही लेखक त्या वेळी चित्रपट क्षेत्रात उमेदवारी करत होते, एका चित्रपट समीक्षा मासिकात लेखन करत. पुस्तकही हिचकॉकच्या ४० चित्रपटांची समीक्षा अशाच रुपाचं होतं.

पुस्तक फ्रेंच भाषेत होतं. या पुस्तकानं हिचकॉकला auteur म्हटलं. या फ्रेंच शब्दाचा विस्कळीत अर्थ असा;  चित्रपट या सामुहीक निर्मितीवर स्वतःचा ठसा उमटवणारा, त्या चित्रपटाचा जन्मदाता ठरणारा, त्या चित्रटाचा लेखक ठरणारा दिग्दर्शक.  Pure, निर्भेळ ” चित्रपट निर्माण करणारा, आणि सस्पेन्सचा बादशहा असं विशेषण लेखकांनी वापरलं. चित्रपट हे दृश्य माध्यम आहे, फक्त दृश्य इतर गोष्टी नाहीत, असं हिचकॉकचं मत होतं.

पुस्तकाचं भाषांतर इंग्रजीत व्हायला साठ साल उजाडलं.

हॉलीवूड आणि ब्रिटीश चित्रपट क्षेत्रात पुस्तक गाजलं. मुळातला ब्रिटीश दिग्दर्शक, हॉलीवूडमधे चित्रपट करतो, दोन्ही ठिकाणी त्याला मान्यता नाही आणि चित्रपट कलेबाबत प्रयोग करणाऱ्या कलाखुळ्या फ्रेंचांनी हिचकॉकला मान्यता दिल्यानं हिचकॉकवर चर्चा सुरु झाली.

हिचकॉकवर चर्चा सुरु झाली आणि या चर्चेनं शैक्षणीक, अकॅडमीक रुप घेतलं. अमेरिका बदलत होती. अमेरिकेतले तरूण मोकळेपणानं सेक्सचा आणि ड्रगचा अनुभव घेत होते, राजकीय भ्रष्टाचारानं समाज हादरला होता. या काळानं भारावलेल्या तरूणानी हिचकॉकचा आणि चित्रपट कलेचा अभ्यास गंभीरपणानं करायचं ठरवलं. चित्रपट हा विषय अमेरिकेतल्या विश्वशाळा कॉलेजात शिकवला जाऊ लागला. हिचकॉक हा त्या पाठ्यक्रमातला एक महत्वाचा भाग झाला.

फ्राँसुआ त्रुफोचे पुस्तक.

फ्राँसुआ त्रुफोचे पुस्तक.

रोमर आणि शाब्रोल हिचकॉकच्या शैलीनं प्रभावीत झाले, त्या शैलीत चित्रपट करू लागले. फ्रान्समधे आणि हॉलीवूडमधे हिचकॉक लाट आली.

नव्या लाटेवर विहरणाऱ्या दिग्दर्शकांत होता फ्राँसुआ त्रुफो.  सायको हा चित्रपट १९६० साली प्रदर्शित झाल्यावर त्रुफोनं हिचकॉकची मुलाखत घ्यायचं ठरवलं. हिचकॉक या कल्पनेनं भारावला. अमेरिकेत काही आठवडे त्रुफोनं रहायचं, मॅरेथॉन प्रश्न विचारायचे आणि त्याचं पुस्तक करायचं असं ठरलं. बर्डस हा चित्रपट पूर्ण होत असताना या मुलाखतीला मुहूर्त मिळाला आणि १९६३ मधे त्रुफोची मुलाखत या स्वरूपात पुस्तक प्रसिद्ध झालं.

शाब्रोल आणि त्रुफो यांची पुस्तकं म्हणजे हिचकॉकची चरित्रं होती, हिचकॉकची कारकीर्द आणि हिचकॉकची आपल्या निर्मितीबद्दलची मतं व अनुभव या पुस्तकांत होते. अजून हिचकॉकची समीक्षा झालेली नव्हती. रॉबिन वुड यांचा हिचकॉक चित्रपटावरचा प्रबंध १९६५ साली प्रसिद्ध झाला. या पुस्तकानं हिचकॉक यांचं  चित्रपट समीक्षा, चित्रपट वाङमय यातलं स्थान पक्कं झालं.

हिचकॉकच्या चित्रपटात अमेरिकन समाज कसा दिसतो, हिचकॉक स्त्रियांची व्यक्तिचित्रं कशी रंगवतो, हिचकॉकच्या चित्रपटातली मुलं, हिचकॉकचे चित्रपट आणि सामाजिक नीतीमत्ता, हिचकॉक आणि हिंसा, हिचकॉकचं खाजगी जीवन, हिचकॉकची प्रेमप्रकरणं अशा नाना अंगांनी पुस्तकं लिहिली गेली.

सायको या सिनेमातल्या मुख्य पात्राचा खून बाथटबमधे होतो. केवळ या एका दृश्याचं विश्लेषण करणारी दोन पुस्तकं लिहिली गेली आहेत.

एकेक चित्रपट घेऊन त्यावर पुस्तकं झाली. सायको या चित्रपटावर १० पुस्तकं झाली, सायको कसा निर्माण झाला यावर आधारलेला एक स्वतंत्र बायोपिकही झाला. व्हर्टिगोवर ५ पुस्तकं, रियर विंडो आणि नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट यावर प्रत्येकी ३ पुस्तकं झाली आहेत.

।।

गांधी खुनाच्या चौकशीचा रीपोर्ट

Weighing the Evidence: Who Killed Gandhi?
The Justice Jeevan Lal Kapur Commission of Inquiry Report
Annotated and edited by Teesta Setalvad
Tulika Books

टिळकांचे नातू गवि केतकर यांनी एका भाषणात, १९६४ साली, सांगितलं की नथूरामनं गांधींचा खून करायचं ठरवलं होतं हे मला सहा महिने आधीच कळलं होतं.

या विधानानं खळबळ उडाली आणि सरकारनं चौकशीसाठी पाठक आयोग नेमला. नंतर पुढं ही चौकशी  जस्टिस कपूर यांच्याकडं गेली. जस्टीस कपूर यानी पोलिसांनी दिलेले पुरावे आणि कोर्टातल्या साक्षींचा विचार करून निकाल दिला. त्या निकालात दिल्ली पोलिसांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला. त्या बरोबरच सावकर आणि मंडळींचा खुनाचा कट रचण्यात हात होता असा निष्कर्ष काढला. कमीशननं केलेली नोंद अशी  “All these facts taken together were destructive of any theory other than the conspiracy to murder by Savarkar and his group.”

कपूर कमीशनचा तीन खंडातला अहवाल दफ्तरात पडून आहे. तीस्ता सेटलवाड यानी तो अहवाल सटीप संपादित करून प्रसिद्ध केला आहे.

साक्षीपुरावे, सरकारची निवेदनं इत्यादी अधिकृत माहिती या अहवालात असल्यानं अभ्यासकांना या माहितीचा उपयोग होण्यासारखा आहे. कुठल्याही घटनेची तपशीलवार माहिती गोळा करून जपून ठेवणं ही पद्दत तशी भारतात कमीच. तुलिका बुक्सनं तेवढं काम केलंय.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0