लखीमपुर खीरी हिंसाचार प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अखेर १२ तासाच्या चौकशीनंतर उ. प
लखीमपुर खीरी हिंसाचार प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अखेर १२ तासाच्या चौकशीनंतर उ. प्रदेश पोलिसांनी अटक केली. अजय मिश्रा चौकशीत सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आशिष मिश्रा यांची कसून चौकशी सुरू करण्यात येत होती. पण ते चौकशीत कोणतेच सहकार्य देण्यास तयार नसल्याने आम्हाला त्यांना अटक करावी लागत असल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस महासंचालक उपेंद्र अग्रवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. आशिष मिश्रा याला लवकरच न्यायालयात उभे केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. आशिष मिश्रा याच्यावर ३०४ अ, ३०२, १२० ब, ३३८, २७९, १४७,१४८, १४९ अशा विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
३ ऑक्टोबरला लखीमपुर खीरी येथे आंदोलक शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा आरोप आशिष मिश्रा यांच्यावर आहे. या घटनेत ४ शेतकरी ठार झाले होते. व नंतर उसळलेल्या हिंसाचारात अन्य ४ जण मरण पावले होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना आधीच ताब्यात घेतले आहे.
COMMENTS