हरीयाणामध्ये शेतकऱ्यांवर लाठीमार

हरीयाणामध्ये शेतकऱ्यांवर लाठीमार

हरीयाणामध्ये करनाल येथे घरोंडा टोलनाक्यावर जमलेल्या शेतकर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात अनेक वयोवृद्ध शेतकरी रक्तबंबाळ झाले आहेत.

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज करनालच्या घरोंडा येथे टोलनाक्यावर आंदोलन केले. या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करनालमध्ये भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह भाजपाचे अनेक खासदार, राज्यसभा खासदार, आमदार, माजी आमदार आणि लोकसभा, विधानसभा लढलेलया अनेक उमेदवारांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी टोल नाक्यावर ठिय्या मांडून बसले होते. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला.

हरीयाणातील शेतकरी नेत्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भाजपा नेते आणि बैठकीचा विरोध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर करनालमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली होती. सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांच्यावर पोलिसांनी दुपारी लाठीमार केला.

शेतकऱ्यांवर लाठीमार केल्याची माहिती वेगाने पासरल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून या घटनेचा निषेध केला आहे. “पुन्हा शेतकऱ्यांचे रक्त सांडले. भारताची मान शरमेने खाली गेली”, असे ट्वीट त्यांनी केले.

COMMENTS