४ दिवसांत पुन्हा २५ रु.ची गॅस दरवाढ

४ दिवसांत पुन्हा २५ रु.ची गॅस दरवाढ

नवी दिल्लीः तेल कंपन्यांनी सोमवारी घरगुती गॅस सिलेंडरची पुन्हा २५ रु.नी दरवाढ केली आहे. ही दरवाढ अनुदानित व विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी आहे. य

गॅस सिलेंडरच्या दरात २५ रु.ची वाढ
घरगुती सिलेंडरचा दर हजार रुपयाच्या वर
घरगुती सिलेंडरच्या दरात १५ रु.नी वाढ

नवी दिल्लीः तेल कंपन्यांनी सोमवारी घरगुती गॅस सिलेंडरची पुन्हा २५ रु.नी दरवाढ केली आहे. ही दरवाढ अनुदानित व विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी आहे. या दरवाढीमुळे मुंबईत आता गॅस सिलेंडरची किंमत ८१९ रु. इतकी झाली असून दिल्लीत हा दर ८१९ रु. कोलकाता येथे ८४५.५० व चेन्नईत ८३५ रु. इतका झाला आहे. मुंबईत कर्मिशियल गॅस सिलेंडरचा दर १,५६३.५० रु. तर दिल्लीत १,६१४ रु., चेन्नईत १,७३० रु. व कोलकाता येथे १,६८१.५० रु. इतका झाला आहे.

गेल्या २६ फेब्रुवारीलाच तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरमध्ये २५ रु.नी वाढ केली होती त्यानंतर लगेचच ही दरवाढ आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ केली होती, त्या बरोबर चार वेळा गॅस सिलेंडर दरातही अनुक्रमे २५, ५०, २५ व आता २५ रु. इतकी दरवाढ झाली आहे.

दरवाढीविरोधात महाराष्ट्रात काँग्रेसकडून सायकल रॅलीचे आयोजन

सातत्याने पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरमधल्या दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत विधान भवनपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन केले होते. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, यशोमती ठाकूर हे राज्यातले मंत्री व काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सोमवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात झाली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: