सवर्णांचे पाणी प्याले म्हणून दलित विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू

सवर्णांचे पाणी प्याले म्हणून दलित विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू

जयपूरः राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात दलित कुटुंबातील एका ९ वर्षाच्या मुलाचा शाळा संचालकाने केलेल्या मारहाणीत रविवारी दुर्दैवाने मृत्यू झाला. २० जुलैला

जात नको आर्थिक निकषावर आरक्षण मागा – केरळच्या न्यायाधीशांचे ब्राह्मणांना आवाहन
बौद्ध की महार वाद : स्वाभिमान हवा की सवलती ?
भारताच्या तुरुंगांमध्ये मनूच्या जातीव्यवस्थेचे राज्य – भाग १

जयपूरः राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात दलित कुटुंबातील एका ९ वर्षाच्या मुलाचा शाळा संचालकाने केलेल्या मारहाणीत रविवारी दुर्दैवाने मृत्यू झाला. २० जुलैला जालोर जिल्ह्यातील सुराणा गावात सरस्वती विद्यामंदिर या शाळेत शिकणाऱ्या इंद्र कुमार मेघवाल याने माठातले पाणी प्याले. त्यावरून संतापलेल्या शाळा संचालक छेल सिंह यांनी मुलाला जबर मारहाण केली व जातीवाचक शिव्याही दिल्या. सवर्ण जातीसाठी राखीव असलेल्या माठातले पाणी दलित मुलाने का प्याले यावर छैल सिंह यांनी मुलाला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत मुलाच्या डोळ्याला, कानाला व चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. हा मुलगा गेले २३ दिवस रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला नंतर उदयपूर येथे हलवण्यात आले. तेथील उपचार कमी पडत असल्यानंतर इंद्र कुमारला अहमदाबाद येथेही नेण्यात आले. पण अखेर १३ ऑगस्टला त्याने प्राण सोडले. इंद्र कुमारला तीन भाऊ असून तो धाकटा होता.

इंद्र कुमार याचे रुग्णालयात उपचार घेत असलेले व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. भारत ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आजही गावागावात अस्पृश्यता पाळत असल्याबद्दल नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

या घटनेनंतर सुराणा गावातील संतप्त लोकांनी शाळा संचालकावर कारवाई करावी अशी मागणी केली. अनेक नागरिक रस्त्यावर निदर्शनेही करत होते. पोलिसांनी छैल सिंह याच्याविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार इंद्र कुमार याच्या कुटुंबाने छैल सिंह याच्याविरोधात ११ ऑगस्टला तक्रार केली. त्यावेळी इंद्र कुमार अहमदाबाद येथे उपचार घेत होता. मेघवाल कुटुंबाच्या तक्रारीनंतर लगेचच पोलिसांनी छैल सिंह याला ताब्यात घेतले. गावातील तणाव पाहता पोलिसांनी जिल्ह्यात इंटरनेट बंदी केली होती.

दरम्यान इंद्र कुमार याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर प्रशासनाने मेघवाल कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी व ५० लाख रु. नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर छैल सिंह याच्या शाळेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे.

छायाचित्र – द हिंदूच्या सौजन्याने.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0