चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान

चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान

सिंधुदुर्गनगरीः तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लाख ४५ हजार ११७ रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानीमध्ये आणखी

सीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा
बहुसंख्यावादी हिंदुत्वाची वाटचाल
पीगॅससच्या रडारवर जगभरातले १४ नेते

सिंधुदुर्गनगरीः तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लाख ४५ हजार ११७ रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ६० घरांचे अंशतः तर १२ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तर १३९ गोठ्यांचे, १९ शाळांचे, ११ शासकीय इमारतींचे, १३ शेड्सचे, ४ सभागृहाचे आणि इतर ५३ ठिकाणते अंशतः नुकसान झाले आहे. तर ७८२ विद्युत पोल अंशतः आणि ९८ पोल पुर्णतः पडले आहेत. तर ३०५ विद्युत वाहिन्यांचे नुकसान अंशतः नुकसान झाले असून १ विद्युत वाहिनीचे पूर्णतः नुकसान झाल्याची माहिती आहे.

एकूण २ हजार ७२ घरांचे ३ कोटी ४२ लक्ष ३७ हजार १० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर १३९ गोठ्यांचे १६ लाख ९४ हजार १०० रुपये, १९ शाळांचे ८ लाख ७५ हजार ७०७ रु.चे, ११ शासकीय इमारतींचे १ लाख ७० हजार रुपयांचे, १३ शेडचे १ लाख १० हजार रु.चे ४ सभागृहांचे ६ लाख १६ हजार रुपयांचे आणि इतर ६ लाख ३८ हजार ३०० रु. असे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची विभाग निहाय व तालुका निहाय माहिती पुढील प्रमाणे असून सर्व नुकसानीची माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे.

* दोडामार्ग – 44 घरांचे नुकसान झाले असून त्यामध्ये 43 घरांचे अंशतः व  एका घराचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 2 शांळांचेही नुकसान झाले असून 43 ठिकाणी विद्युत पोल पडले आहेत. 43 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

* सावंतवाडी – 116 घरांचे अंशतः तर 4 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 13 गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. 350 ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून 100 विद्युत पोलही पडले आहेत. एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे.

* वेंगुर्ला – 87 घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद असून 6 गोठ्यांचे, एका शाळेचे, 3 शासकीय इमारतींचे, 45 विद्युत पोल आणि 2 विद्युत वाहिन्यांचे अंशतः नुकसान झाले आहे.

* कुडाळ – 302 घरांचे, 22 गोठ्यांचे, 7 शाळांचे, 2 शेडचे व 2 सभागृहांचे अंशतः नुकसान झाले असून 120 विद्युत पोलचे अंशतः नुकसान झाले आहे.

*मालवण – 972 घरांचे अंशतः तर 7 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 25 गोठ्यांचे, 2 शाळांचे, 8 शासकीय इमारती, 157 विद्युत पोल, 10 शेडचे व एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे. 412 ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

* कणकवली – 133 घरांचे, 29 गोठ्यांचे, एका शाळेचे, 66 विद्युत पोल, 16 विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे.

* देवगड – 145 घरांचे, 36 गोठ्यांचे, 4 शाळांचे, 132 विद्युत पोल, 95 विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे.

* वैभववाडी – 262 घरांचे, 8 गोठ्यांचे, एका शाळेचे, 120 विद्युत पोल, 35 विद्युत वाहिन्या आणि एका शेडचे अंशतः नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात एकूण 907 ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटता महावितरणला

तौक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात 880 विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील 21 सब स्टेशन ही बंद पडली होती. दुपारपर्यंत त्यापैकी 12 ते 13 सब स्टेशन सुरू करण्याचे काम पूर्ण झाले होते. तर उर्वरित सबस्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळही जिल्ह्यात दाखल होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0