पत्रकार मनदीप पुनिया यांना जामीन

पत्रकार मनदीप पुनिया यांना जामीन

नवी दिल्लीः शहरातील सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांशी गैरवर्तन केल्या प्रकरणात अटकेत असलेले मुक्त पत्रकार मनदीप पुनिया यांना मंगळवारी दिल्ल

प्रशासनाकडून ईव्हीएमची पळवापळवीः अखिलेशचा आरोप
बेनेगल, अपर्णा सेन, अनुरागसह अन्य ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे
पियुष गोयल यांचा बॉलीवूड शो फसला

नवी दिल्लीः शहरातील सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांशी गैरवर्तन केल्या प्रकरणात अटकेत असलेले मुक्त पत्रकार मनदीप पुनिया यांना मंगळवारी दिल्लीतील एका न्यायालयाने जामीन दिला. पुनिया यांच्याविरोधात तक्रार करणारे, पीडित व साक्षीदार हे सर्वच पोलिस असून आरोपी कोणत्याही पोलिसावर दबाव आणू शकत नाहीत, असे स्पष्ट करत न्या. सतबीर सिंह लांबा यांनी पुनिया यांना जामीन दिला.

पुनिया यांच्यावर भारतीय दंडसंहितेलील कलम १८६, ३५३ व ३३२ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

न्यायालयाने पुनिया यांना परवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. या जामीनाच्या काळात आरोपीने कोणताही गुन्हा व गैरवर्तन करू नये व त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अटी घातल्या आहेत.

मूळ प्रकरण काय होते?

३० जानेवारी रोजी सिंघु सीमेवर स्थानिक रहिवाशांकडून आंदोलकांवर दगडफेक सुरू झाली होती. त्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी मनदीप पुनिया तेथे गेले होते. पण पुनिया आंदोलकांना भडकवत होते, असा आरोप करत पोलिसांनी त्यांना अटक केली. पुनिया हे पोलिसांच्या कामात अडथळे आणत होते, एका हवालदाराशी त्यांच्या शारीरिक संपर्क आला व पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्स ओलांडण्याचा ते प्रयत्न करत होते, असा आरोप करत पोलिसांनी पुनिया यांच्यावर ७ तासानंतर गुन्हे दाखल केले होते.

पुनिया यांना अटक केल्यानंतर दिल्लीतल्या पत्रकार संघटनांनी दिल्ली पोलिस मुख्यालयावर एक मोर्चाही काढला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: