कुलगुरुंच्या तक्रारीनंतर मशिदीवरच्या स्पीकरचा आवाज कमी

कुलगुरुंच्या तक्रारीनंतर मशिदीवरच्या स्पीकरचा आवाज कमी

नवी दिल्लीः मशिदीतून दिल्या जाणार्या अजानचा आवाज कमी करावा अशी तक्रार अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू संगीता श्रीवास्तव यांनी केल्यानंतर लाल मशीद समित

हलाल मांसावर बंदी हवीः भाजप आमदाराची मागणी
कार्टूनिस्टवर बेअदबीची कारवाई करण्यास संमती
अमेरिकन बेदरकारपणा व विषाणूचे आक्रमण

नवी दिल्लीः मशिदीतून दिल्या जाणार्या अजानचा आवाज कमी करावा अशी तक्रार अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू संगीता श्रीवास्तव यांनी केल्यानंतर लाल मशीद समितीने मशिदीवरील लाऊड स्पीकरचा आवाज ५० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर कुलगुरुंच्या घराच्या दिशेने असलेल्या लाऊड स्पीकरची दिशाही बदलली गेली आहे.

३ मार्चला संगीता श्रीवास्तव यांनी अजानच्या आवाजामुळे आपल्याला पहाटे लवकर उठावे लागते. दिवसभर काम करत असल्याने लवकर उठल्याने कामावर परिणाम होतो, अशी तक्रार अलाहाबादचे जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांच्याकडे केली होती. आपल्या तक्रारीत श्रीवास्तव यांनी आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही पण अजान ही लाऊड स्पीकरशिवाय केली जाऊ शकते, असे म्हटले होते. रमजानच्या काळात ‘सेहरी’साठीही लाऊड स्पीकरवरून आवाज दिला जातो, त्यानेही अनेकांना त्रास होतो. भारताच्या राज्यघटनेने प्रत्येक धर्माच्या नागरिकाला धर्माचरणाचा अधिकार दिला आहे, त्या अधिकाराचे सचोटीने पालन सर्वांकडून व्हावे अशी मागणी त्यांनी केली होती.

श्रीवास्तव यांनी आपल्या तक्रारीत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या २०२० मध्ये दिलेल्या एका निर्णयाचाही उल्लेख केला होता. अजान हा मुस्लिम धर्मातील महत्त्वाचा भाग असला तरी लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मोठ्या आवाजात तो म्हटला जाऊ नये, असे न्यायालयाने म्हटले होते, असे श्रीवास्तव यांचा मुद्दा होता. श्रीवास्तव यांनी आपल्या तक्रारीची एक प्रत अलाहाबादच्या विभागीय आयुक्तांना, पोलिस महानिरीक्षकांना व वरिष्ठ जिल्हा पोलिस प्रमुखांनाही पाठवली होती. श्रीवास्तव यांच्या या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधितांना सूचना दिल्या होत्या.

तर लाल मशीद समितीचे विश्वस्त कलिमुर्रहम यांनी मशिदीवरून लाऊड स्पीकरवरून दिल्या जाणारा अजानचा आवाज ५० टक्क्यांपर्यंत कमी केल्याचा व कुलगुरुंच्या घराकडे असलेल्या लाउड स्पीकरची दिशाही बदलल्याचे सांगितले. हा विषय सौहार्दाने संपुष्टात आणला गेला असेही ते म्हणाले.

श्रीवास्तव यांचे घर मशिदीपासून केवळ ४०० मीटर अंतरावर आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0