राज्यसेवा मुख्य परीक्षा ४, ५ आणि ६ डिसेंबरला

राज्यसेवा मुख्य परीक्षा ४, ५ आणि ६ डिसेंबरला

मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

आर्थिक अटींवर १०% आरक्षण समानतेच्या तत्त्वाचा भंग ?
‘लॉकडाऊन की ब्रेकडाऊन’
आश्चर्य जनतेच्या कौलाचे नव्हे, न्यायालयीन कौलाचे वाटायला हवे !

मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

२०२० सालासाठीची राज्यसेवा मुख्य परीक्षा ४, ५ आणि ६ डिसेंबर, २०२१ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या केंद्रावर घेण्यात येणार आहे.

परीक्षेसंदर्भात राज्य लोकसेवा आयोगाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे, की राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२०, दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या केंद्रांवर घेण्यात येणार आहे. अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचना पहावी. असे आयोगातर्फे कळवण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०चा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0