दिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल

दिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल

मुंबईः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढण्यास दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांना परवानगी दिल

‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’
३ शेती कायदे रद्द व्हावेतः सुप्रीम कोर्टात याचिका
‘आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची आकडेवारी नाही’

मुंबईः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढण्यास दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांना परवानगी दिली आहे. पण ही परवानगी देताना राजपथावरच्या संचलनाला कोणतीही बाधा येऊ नये, ट्रॅक्टर परेड संपूर्णपणे शांततेत काढावी ही अट पोलिसांनी घातली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातल्या २१ जिल्ह्यातून हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत मुंबईकडे कूच करत आहे. मुंबईच्या आझाद मैदान परिसरात तीन दिवस शेतकर्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर हे शेतकरी २६ जानेवारी आझाद मैदानात प्रजासत्ताक दिनादिवशी ध्वजारोहण करणार आहेत.

राजधानीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातल्या या शेतकर्यांचा पाठिंबा आहे. त्यासाठी सत्याग्रह करण्यासाठी हे शेतकरी येत आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकर्यांशी संवाद साधणार असल्याचे वृत्त आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही शेतकर्यांना संबोधित करणार आहेत. शेतकरी नेते आपले पत्र राज्यपालांना देणार आहेत.

राज्यातले शेतकरी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली मुंबईत येत असून नाशिकमधून अखिल भारतीय किसान सभेचे सुमारे १५ हजारहून अधिक शेतकरी रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले होते. हे सर्व शेतकरी तीन दिवसांचे धरणे आझाद मैदानात देणार आहेत. या आंदोलनाला सत्ताधारी महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याने आंदोलकांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दखल घेतली जात आहे. मुंबईत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. आझाद मैदानात राज्यातले हजारो शेतकरी जमा होत असल्याने भव्य मंडप व अन्य मदत उभी केली गेली आहे.

दिल्लीत ट्रॅक्टर परेडला परवानगी

दिल्लीच्या वेशीवर गेले तीन महिने ठाण मांडून बसलेले हजारो शेतकरी २६ जानेवारीला आपली स्वतंत्र ट्रॅक्टर परेड काढणार आहेत. दिल्ली पोलिसांनी या परेडला परवानगी देताना शांतता राखण्याचे व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

या ट्रॅक्टर परेडमधून अनुचित प्रसंग व्हावेत यासाठी पाकिस्तानमधून ३०८ ट्विटर हँडलवरून प्रचार सुरू असल्याचे पोलिसांचा दावा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0