मोदींच्या विधानावर जाणूनबुजून गैरसमज : पीएमओ

मोदींच्या विधानावर जाणूनबुजून गैरसमज : पीएमओ

नवी दिल्लीः  लडाखमधील गलवान खोर्यात भारतीय हद्दीत चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केलेली नसून भारताने आपला भूभागही गमावला नसल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी पंतप

नव्या सरकारपुढील सामरिक आव्हाने व संरक्षण अजेंडा
पंतप्रधान वस्तुसंग्रहालयात नेहरूंना जागा नाही
‘मुस्कटदाबी करणे हा देशद्रोह कायद्याचा गैरवापर’

नवी दिल्लीः  लडाखमधील गलवान खोर्यात भारतीय हद्दीत चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केलेली नसून भारताने आपला भूभागही गमावला नसल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिल्यानंतर देशभर वादळ उठले आहे. सर्वच विरोधी पक्षांनी मोदींवर हल्ला करत चीनची घुसखोरीच नसेल तर त्यांच्यासोबत चर्चा कोणत्या मुद्द्यावर सुरू आहे, असा सवाल केला आहे. तर सामान्य जनतेतूनही २० जवान शहीद कोणत्या हद्दीत झाले असे प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियातूनही मोदींच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

या पार्श्वभूमीवर शनिवारी पंतप्रधान कार्यालयाने एक खुलासा जाहीर करत पंतप्रधान मोदींचे विधान जवान सीमेवर शहीद झाल्यानंतरची परिस्थिती कथन करणारे असून या जवानांनी गलवानमध्ये उभे केलेले बांधकाम उध्वस्त करत चीनचे आक्रमण रोखले. मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत जे विधान केले त्यावर जाणूनबुजून गैरसमज पसरवले जात असून १५ जूनला जो हिंसाचार झाला त्याला चीनच जबाबदार असून चिनी सैनिक मागे हटण्यास तयार नव्हते असे या खुलाशात म्हटले आहे.

प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारतीय सीमेत येण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. या रेषेच्या संदर्भात घेतलेल्या एकतर्फी भूमिकेला भारताचा कायम विरोध असेल, असेही या खुलाशात म्हटले आहे. एकीकडे आपले जवान सीमेचे संरक्षण करत असताना पंतप्रधानांच्या वक्तव्यावर जर प्रश्न उपस्थित करून वाद निर्माण केला जात असेल तर ती दुर्दैवी बाब आहे, असेही खुलाशात म्हटले आहे.

भारताने आपला प्रदेश गमावला – राहुल गांधी

चीनने भारतीय प्रदेशात घुसखोरी केली नसल्याच्या पंतप्रधानांच्या विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी हल्ला चढवला. पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणानुसार चीनच्या आक्रमणात भारताने आपला भूभाग गमावला, जर जमीन चीनची असेल तर आपले सैनिक का शहीद झाले? आपले सैनिक कुठे शहीद झाले? असे आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरवर मोदींना उद्देशून उपस्थित केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0