पंतप्रधानांचे दत्तक खेडे – वृत्तांकनावरून पत्रकारावर गुन्हा

पंतप्रधानांचे दत्तक खेडे – वृत्तांकनावरून पत्रकारावर गुन्हा

नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात अन्नधान्याच्या टंचाईसंदर्भात वृत्तांकन करताना खोटी माहिती प्रसिद्ध केल

गृहराज्यमंत्री प्रामाणिक बांगलादेशी असल्याचा आरोप
मध्य प्रदेशमधील विजय रा.स्व.संघामुळे
पीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी

नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात अन्नधान्याच्या टंचाईसंदर्भात वृत्तांकन करताना खोटी माहिती प्रसिद्ध केल्याच्या तक्रारीवरून उ. प्रदेश पोलिसांनी Scroll.in या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक व मुख्य संपादक सुप्रिया शर्मा यांच्यावर फिर्याद दाखल केली आहे.

लॉकडाऊनमुळे वाराणसी मतदारसंघात येणार्या डोमरी या गावातल्या नागरिकांचे अन्नधान्य न मिळाल्याने कसे हाल झाले या संदर्भातील वृत्तांकन सुप्रिया शर्मा यांनी केले होते. या वृत्तांकनात शर्मा यांनी या गावातील अनेक ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या व तशी वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती. डोमरी हे गाव मोदी यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतले आहे.

पण याच डोमरी गावातील रहिवासी असलेल्या माला देवी यांनी स्क्रोल डॉट इनमध्ये आलेली माहिती विपर्यास करणारी असून कोरोनाच्या काळात आपली झालेली परिस्थिती चुकीची कथन करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या तक्रारीवरून उ. प्रदेश पोलिसांनी सुप्रिया शर्मा यांच्याविरोधात अनु. जाती,जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा१९८९) व समाजात तेढ निर्माण होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य व मानहानी केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

सुप्रिया शर्मा यांनी मोदींनी दत्तक घेतलेल्या गावातील डोमरी गावातील परिस्थिती कथन करताना माला देवी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत माला देवी यांनी आपण अनेक घरात काम करत असून आपल्याकडे रेशन कार्ड नसल्याने रेशनचे धान्य मिळताना अडचणी आल्या याची माहिती सुप्रिया शर्मा यांना दिली होती.

पण माला देवी यांनी आपण अशी कोणतीही माहिती मुलाखतीत दिली नव्हती असे स्पष्ट करत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून त्या वाराणसी नगरपालिकेत स्वच्छता कामगार म्हणून काम करत असून लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या कुटुंबाला कसलाही त्रास झाला नसल्याचे सुप्रिया शर्मा यांना सांगितले होते.

पण शर्मा यांनी मुलाखतीत फेरफार करून विपर्यास्त माहिती प्रसिद्ध केली असा आरोप माला देवी यांनी केला आहे. आपल्याबाबतीत माहिती एकतर चुकीची आहे, त्यात माझी मुले भूकबळी ठरतील असे सांगत त्यांनी आमची गरीबी व जातीची थट्टा केल्याचा आरोपही माला देवी यांनी केला आहे.

स्क्रोलने आरोप फेटाळले

दरम्यान स्क्रोल डॉट इनने आपले वृत्तांकन सत्य असून माला देवी यांनी जशी माहिती दिली तशी ती प्रसिद्ध केल्याचे सांगितले. असे गुन्हे दाखल करून पत्रकारितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया स्क्रोलने दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0