विधानसभेच्या अध्यक्षपदी नार्वेकर

विधानसभेच्या अध्यक्षपदी नार्वेकर

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची १६४ मते पडल्याने निवड झाली. त्यांनी राजन साळवी यांचा पराभव केला. साळवी यांना १०७

‘भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य’
गंगेच्या शुद्धीकरणाच्या जाहिरातींवर कोट्यावधी लुटले
‘ट्रॅक्टर रॅली’ संबंधित निर्णय पोलिसांनी घ्यावेत’

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची १६४ मते पडल्याने निवड झाली. त्यांनी राजन साळवी यांचा पराभव केला. साळवी यांना १०७ मते मिळाली.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती.

सकाळी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेची सभा सुरू झाली. नवीन सदस्य आणि मंत्र्यांचा परिचय झाल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणुक घेण्यात आली.

समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यासह समाजवादी पक्षाचे २ सदस्य आणि एमआयएम पक्षाचा एक सदस्य तटस्थ राहिला.

दरम्यान शिवसेनेच्या ३९ सदस्यांनी पक्षाच्या विरोधात मतदान केल्याचे यावेळी सभेच्या पटलावर घेण्यात आले. राज्यपालांनी इतके दिवस अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी विलंब लावला आणि आत्ता परवानगी कशी दिली, हे लक्षात आल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील म्हणाले. राज्यपालांनी आता महाविकास आघाडीने जी १२ सदस्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणू यादी पाठवली आहे, ती मंजूर करावी असा टोला पाटील यांनी मारला.

नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाचा उल्लेख शिवसेना असा केला. १६ आमदारांनी पक्षाने व्हीप काढलेला असतानाही, पक्षविरोधी मतदान केल्याचे एकनाथ शिंदे गटाचे पत्र त्यांनी पटलावर घेतले.

राहुल नार्वेकर हे पूर्वी शिवसेनेमध्ये होते. नंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून मावल लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपतर्फे कुलाबा मतदार संघातून निवडून आले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0