नाशिक मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबरला

नाशिक मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबरला

मुंबईः  लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी,

अनेक वादानंतर, स्थापन झाले स्टॅटिस्टिक्स रीफॉर्म पॅनेल
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका ५ ऑक्टोबरला
राज्यातर्फे हजार कोटींचे कर्जरोखे

मुंबईः  लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे  ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिली.

भुजबळ म्हणाले की,”करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नाशिकमध्ये होणारे संमेलन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर करोनाच्या संदर्भातील शासनासहीत सर्वांचे प्रयत्न निश्चितपणे कामी आले व मोठ्या प्रमाणावर या महामारीवर नियंत्रण मिळाले आहे असे सध्याचे वातावरण आहे. हळूहळू सर्वच व्यवहार सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली. त्यामुळे मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबर २०२१ या काळात घेण्याचे ठरले आहे.”

संमेलनाचा कार्यक्रम

शुक्रवारी ३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिळकवाडी येथून ग्रंथ दिंडी निघेल. संमेलनस्थळी दिंडी पोहोचल्यावर सकाळी ११ वाजता ध्वजारोहण होईल. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होण्यापूर्वी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल आणि नंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. त्याच दिवशी रात्री निमंत्रित कवींचे काव्य संमेलन होणार आहे.

४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता’ बाल साहित्य मेळाव्याचे ‘ उद्घाटन दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. याव्यतिरिक्त स्मृतीचित्रे – लक्ष्मीबाई टिळक यावर परिचर्चा तसेच कथाकथन आणि कोरानानंतरचे अर्थकारण आणि मराठी साहित्य व्यवहार, मराठी नाटक एक पाऊल पुढे दोन पावले मागे, शेतकऱ्यांची दुःस्थिती, ऑनलाइन वाचन- वाङ्मय विकासाला तारक की मारक, साहित्यनिर्मितीच्या कार्यशाळा गरज की थोतांड, गोदातिरीच्या संतांचे योगदान असे परिसंवाद होणार आहेत. शिवाय ‘ कविकट्टा ‘ हाही असणार आहे. तसेच नाशिकच्या कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आणि नाशिकच्या लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन ही देखील आकर्षणे असणार आहेत.

ज्येष्ठ प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांचा सत्कार व प्रकट मुलाखत तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक व नाटककार मनोहर शहाणे यांचा गौरव ४ डिसेंबर २०२१ रोजी केला जाणार आहे.

याच दिवशी नाशिकमधील स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम असेल. ५ डिसेंबर २०२१ रोजी संमेलनाचा समारोप झाल्यावर देखील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. संमेलनाचा समारोप ५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0