वानखेडे फोन टॅपींग करतात – मलिक

वानखेडे फोन टॅपींग करतात – मलिक

‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अजून काही लोक फोन टॅपींग करत असून, त्यांनी खोटा जन्म दाखला वापरुन भारतीय महसूल सेवेमध्ये प्रवेश घेतल्याचा आ

राज्यसभेच्या ३ जागांमुळे बदलले म. प्रदेशचे राजकारण
ऋग्वेदातल्या मांसाहाराबद्दल टिप्पणी केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी निलंबित
पाकिस्तानी लष्कराची अफगाणिस्तानवर पकड

‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अजून काही लोक फोन टॅपींग करत असून, त्यांनी खोटा जन्म दाखला वापरुन भारतीय महसूल सेवेमध्ये प्रवेश घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

मलिक यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “मुंबई आणि ठाण्यामधून दोन लोकांच्या मदतीने समीर वानखेडे फोन टॅपींग करत आहेत. मला वाटतंय की वानखेडे मर्यादा ओलांडत आहे. लोकांचे कॉल्स इंटरसेप्ट केलं जात आहे. दोन खासगी लोक आहेत. एक व्यक्ती मुंबईत आहे, तर एक व्यक्ती ठाण्यात आहे. समीर वानखेडे कशापद्धतीने लोकांचे फोन टॅप करत आहे, याचेसुद्धा पुरावे मी समोर आणणार आहे. “

मलिक यांनी वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेताना सांगितले, “समीर वानखेडे यांचा मी काल दिलेला जन्माचा दाखला खरा आहे. त्यावर वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद आहे. नीट पाहिल्यास त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जन्माचे दाखले ऑनलाइन सहज मिळतात. वानखेडेंच्या बहिणीचं सर्टिफिकेट ऑनलाइन उपलब्ध आहे. पण वानखेडे यांचे सर्टिफिकेट ऑनलाइन मिळत नाही. आम्ही रजिस्टर चेक केले. दीड महिने आम्ही हा कागद शोधत होतो. तेव्हा हे स्कॅन डॉक्युमेंट मिळाले. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे जन्माने दलित आहेत. वाशिममधून त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवले. त्याच आधारे त्यांनी नोकरी केली. माझगावमध्ये असताना त्यांनी स्वर्गीय झायदा खान यांच्यासोबत लग्न केलं. ते दाऊद खान बनले. दोन मुलांचा जन्म झाला. पूर्ण कुटुंब मुस्लिम असल्याप्रमाणे जगत होते. वडिलांच्या आधीच्या कागदपत्राच्या आधारावर समीर वानखेडे यांनी आपली कागदपत्रे तयार केली.

'एनसीबी'च्या एका अधिकाऱ्याने पाठवलेले पत्र नवाब मलिक यांनी ट्विट केले.

‘एनसीबी’च्या एका अधिकाऱ्याने पाठवलेले पत्र नवाब मलिक यांनी ट्विट केले.

बोगस कागदपत्राच्या साह्यानं त्यांनी एका मागासवर्गीय मुलाचा अधिकार हिसकावून घेतला. याबाबत विविध दलीत संघटना माझ्या संपर्कात आहेत. आम्ही हे प्रमाणपत्र जातवैधता समितीसमोर सादर करणार आहोत. वानखेडे यांच्या विरोधात तक्रार करणार आहेत. सत्य लोकांसमोर येईल.”

आर्यन खान आणि क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणामध्ये दररोज वेगवेगळे खुलसे होत आहेत. नवाब मलिक यांनी, वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रतच सादर केली. मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची छायाचित्रेही प्रसारित केली.

मलिक म्हणाले, की त्यांची लढाई एनसीबीसोबत नाही. गेल्या ३५ वर्षात एनसीबीने खूप चांगले काम केले आहे. याआधी कोणीही एनसीबीच्या कामावर शंका उपस्थित केलेली नाही. पण एक व्यक्ती फसवणूक करून सरकारी नोकरी मिळवतो आणि जेव्हा त्यांनी या गोष्टी समोर आणल्या तेव्हा नवाब मलिक अधिकाऱ्याच्या खाजगी आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या भाष्य करत आहे असे म्हटले जाते. त्यांच्या कुटुंबातील लोकांना यामध्ये खेचले जात आहे असे म्हटले जात आहे. ते म्हणाले, “मी कोणाविषयी असा काहीही प्रकार केलेला नाही. काल जे जन्म प्रमाणपत्र ट्विटरवर शेअर केले होते त्यावरून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मी हिंदू मुस्लिम म्हणून हे प्रकरण पुढे आणत नव्हतो. भाजपाने या प्रकरणात धर्मावरून प्रश्न उपस्थित केले. मी कधीही धर्माच्या नावावर राजकारण नाही केले हे लोकांनाही माहिती आहे. ”

मलिक म्हणाले, की यासंदर्भात आणखी कागदपत्रे मिळत आहेत आणि लवकरच हे प्रकरण वैधता समिती समोर जाईल. एनसीबीच्या अधिकाऱ्याने एक पत्र पाठवले आहे. हेच पत्र मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहे. हे पत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत.

“समीर वानखेडेंच्या वडिलांनी दावा दाखल करावा. ४९९, ५०० अंतर्गत त्यांना अधिकार आहे. अंधेरी किंवा कुर्ला कोर्टात जावं. मला आरोपी करावं. मी तिथे कायदेशीर लढाई लढत यांचा फर्जीवाडा समोर आणणार. मी दाऊद वानखेडे यांना आव्हान देतो की, माझ्याविरोधात ४९९, ५०० अंतर्गत तक्रार दाखल करा. मुलीनेही आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल कऱणार असल्याचं सांगितलं आहे. १०० कोटींची गोष्ट करु नका, त्यासाठी १० टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. तुमच्याकडे दोन नंबरचे १००० कोटी असतील पण स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी लागणारा कागद तुमच्याकडे नसेल. समीर दाऊद वानखेडे, दाऊद वानखेडे, यास्मिन वानखेडे यांनी दावा दाखल करा असं माझं आव्हान आहे,” असे मलिक म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0