उ. प्रदेशात सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य

उ. प्रदेशात सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य

लखनऊः उत्तर प्रदेशातल्या सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रीय गीत म्हटले जाणार आहे. हा निर्णय उत्तर प्रदेश मदरसा एज्युकेशन बोर्डाने गुरुवारी जाहीर केला. हा

गुजरात मोदी सरकार पाडण्याचा कट – एसआयटी
बेकायदा पदच्युती, हेरगिरी आणि आता माहितीपासूनही वंचित
गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणात ३ नौदल अधिकाऱ्यांना अटक

लखनऊः उत्तर प्रदेशातल्या सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रीय गीत म्हटले जाणार आहे. हा निर्णय उत्तर प्रदेश मदरसा एज्युकेशन बोर्डाने गुरुवारी जाहीर केला. हा आदेश ९ मे रोजी राज्यातल्या सर्व जिल्हा अल्पसंख्याक विकास अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. पण गुरुवारी याची अधिकृत घोषणा रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी केली.

मदरशांमध्ये प्रार्थनांबरोबरच राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले असून १२ मे पासून सुरू झालेल्या सर्व वर्गांना हा निर्णय बंधनकारक असल्याचे पांडे यांनी सांगितले.

मदरशांचे वर्ग सुरू होण्याआधी विद्यार्थी व शिक्षकांना राष्ट्रगीत म्हणावे लागेल. ही सक्ती सर्व सरकार मान्यताप्राप्त, वित्तीय सहाय्य मिळत असलेल्या व बिगर वित्तसहाय्य मिळत असलेल्या मदरशांवर आहे. या निर्णयाची अंमलबजावणी योग्य होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

दरम्यान या निर्णयाचे भाजपचे एक नेते मोहसिन रझा यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे मुलांमध्ये देशप्रेम व शिस्त वाढेल असे ते म्हणाले.

उ. प्रदेशात १६,६४१ मदरसे असून ५६० मदरशांना वित्तीय अनुदान मिळते.

(छायाचित्र – एनडीटीव्ही)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0