व्हॉट्सअप डाऊनलोडची संख्या ८० टक्क्याने रोडावली

व्हॉट्सअप डाऊनलोडची संख्या ८० टक्क्याने रोडावली

नवी दिल्ली : तुम्ही ‘सिग्नल’ अथवा ‘टेलिग्राम’वर असाल तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप यादीतील कित्येक सदस्यांचे या दोन सोशल मीडियाचे सदस्य बनल्याचे संदेश

कोविडच्या ‘रेअर’ लक्षणांकडे दुर्लक्ष?
सुधा भारद्वाज यांना जामीन
काश्मीरात सुरक्षेचे कारण देत शिक्षक बडतर्फ

नवी दिल्ली : तुम्ही ‘सिग्नल’ अथवा ‘टेलिग्राम’वर असाल तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप यादीतील कित्येक सदस्यांचे या दोन सोशल मीडियाचे सदस्य बनल्याचे संदेश आले असतील.

२६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत एकट्या भारतात व्हॉट्सअप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ८० टक्क्याने घसरलेली दिसते. ही टक्केवारी मोबाइल अनॅलॅटिक्स व सेन्सर टॉवर या फर्मने प्रसिद्ध केली आहे. १७ ऑक्टोबर ते २५ दरम्यान व्हॉट्स अप सुमारे ९० लाख ग्राहकांनी डाऊनलोड केले होते ती टक्केवारी २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान सुमारे १० लाख ८० हजारांवर दिसून आलेली आहे.

याच काळात सिग्नल हे ऍप डाऊनलोड करणाऱ्यांची टक्केवारी ६३ टक्क्यांनी (९६०० ग्राहक) व टेलिग्रामची १० टक्क्यांनी (९ लाख २० हजार ग्राहक) वाढल्याचे दिसून आले आहे. ही आकडेवारी एकदाच डाऊनलोड करणाऱ्या ग्राहकांची आहे. त्यात रिइन्स्टॉल किंवा अन्य मोबाइल संचावर डाउनलोड करणाऱ्यांची नाही, असे सेन्सर टॉवरचे म्हणणे आहे.

२९ ऑक्टोबरला व्हॉट्सअपने त्यांच्या ऍपवर इस्रायल सॉफ्टवेअर कंपनी पेगॅससकडून घुसखोरी करत ग्राहकाच्या माहितीवर पाळत ठेवल्याचा व ती माहिती विकल्याचा आरोप केला होता. पेगॅसस कंपनीने व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलिंग फिचर्समध्ये जे कच्चेदुवे होते ते नेमके हेरले होते व त्यातून त्यांनी भारतातील १२१ पत्रकार, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते यांची खासगी माहिती मिळवली होती. आणि असा आरोपही व्हॉट्सअपने जाहीरपणे केला होता. पेगॅससने आयमेसेज, स्कायपी, टेलिग्राम, वीचॅट, फेसबुक मेसेंजर, व्हॉट्सअप व अन्य माध्यमातूनही माहिती मिळवण्याचा संशय आहे.

व्हॉट्सअपच्या तक्रारीनंतर भारतात या मुद्द्याने राजकीय वळण घेतले. तर सरकारने व्हॉट्सअप कंपनीलाच या संदर्भात माहिती देण्यास सांगितले. व्हॉट्सअपवरच्या हेरगिरीमुळे सिग्नल व टेलिग्राम सारख्या अन्य माध्यमांकडे पत्रकार, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते वळले.

पण या घडामोडीकडे अन्य दृष्टिकोनातून पाहता येते, असे मत तक्षशिला इन्स्टिट्यूशनमधील सहाय्यक प्रा. अनुमप मनूर यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात, समोर आलेली आकडेवारी ही नव्या ग्राहकाने सिग्नल व टेलिग्राम डाऊनलोड केलेली आहे, त्याचा अर्थ त्यांनी व्हॉट्सअप सोडले आहे असा होत नाही. एकाएकी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अन्य सोशल मीडियाकडे जाणे हे सहजासहजी शक्य नसते. आणि तसे लाखो ग्राहक सोडूही शकत नाहीत. अगदी सरकारने एखाद्या सोशल मीडिया माध्यमावर निर्बंध, बंदी घातली असेल तर आपण ते समजू शकतो पण इथे तसे काही झालेले नाही. हा विषय सामूहिक भावनेचा झाला आहे. व्हॉट्सअप हॅक होऊ शकते व हे माध्यम सुरक्षित नाही इतकी माहिती लोकांपर्यंत पोहचली आहे. आणि व्हॉट्सअपने आपल्या माध्यमातील कच्चेदुवे लक्षात घेऊन भविष्यात असे धोके उद्भवणार नाहीत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्या कंपन्या सतत नवे संशोधन बदल करत असतात. त्यांच्या मध्ये तीव्र स्पर्धा असते. प्रत्येक कंपनीपुढे अन्य कंपन्यांची आव्हाने असतात. अशा परिस्थितीत व्हॉट्सअपने ग्राहकांची सुरक्षितता हेच आमचे प्रमुख प्राधान्य असेल असे स्पष्ट केले आहे. त्यांनी इस्रायलच्या सॉफ्टवेअरचा पूर्ण बंदोबस्त केला आहे असेही म्हटले आहे.

मन्नूर म्हणतात, सोशल मीडियावरील भारतीय ग्राहक खासगीपणाबाबत फारसा आग्रही नाही व त्याला तो प्राधान्यही देत नाही. त्यांची एकमेकांशी सहज संवाद साधता यावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सिग्नल व टेलिग्राम डाउनलोड करणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी त्याने व्हॉट्सअपच्या बाजारपेठेला मोठा धक्का बसलेला नाही. पण व्हॉट्सअपला हा सौम्य धक्का जरूर होता. याचे आपल्याला विश्लेषण करण्याची गरज आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0