अरुणाचलमध्ये चीनची घुसखोरी; दुसरी वस्ती बांधली

अरुणाचलमध्ये चीनची घुसखोरी; दुसरी वस्ती बांधली

नवी दिल्लीः अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करत चीनने कमीत कमी ६० इमारती बांधल्याचे उपग्रह छायाचित्र एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले आहे. या इमारती नागरी वस्त्या

मुंबईत कोरोनाचे दोन संशयित, चीनमध्ये २६ मृत्यू
चीन नव्हे तर अमेरिकेशी भारताचा सर्वाधिक व्यापार
२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत

नवी दिल्लीः अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करत चीनने कमीत कमी ६० इमारती बांधल्याचे उपग्रह छायाचित्र एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले आहे. या इमारती नागरी वस्त्या असल्याचा अंदाज असून ही वस्ती अरुणाचल प्रदेशातील शी योमी जिल्ह्यापासून ९३ किमी अंतरावर असल्याचे एनडीटीव्हीचे म्हणणे आहे. चीनची ही भारतीय हद्दीतील सुमारे ६ किमी घुसखोरी असून अरुणाचल प्रदेशात चीनने बांधलेली दुसरी नागरी वस्ती असून याची छायाचित्रे अमेरिकेच्या संरक्षण खात्याने खरी असल्याचे म्हटले आहे.

२०१९ मध्ये या भागात नागरी वस्त्या बांधल्याची उपग्रह छायाचित्रे नव्हती यावरून गेल्या वर्षभरात चीनने या वस्त्या बांधल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात भारतीय लष्कराशी संपर्क साधण्याचा एनडीटीव्हीने प्रयत्न केला पण लष्कराने अद्याप त्याच्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

२०१९मध्ये अरुणाचल प्रदेशमधील भाजपचे खासदार तापिर गांव यांनी आपल्या राज्यात चीनने सुमारे ५० किमी अंतरापर्यंत घुसखोरी केल्याचे संसदेत जाहीरपणे सांगितले होते. त्यांनी अरुणाचल प्रदेशात डोकलाम सारखी घुसखोरी होऊ देऊ नका, अशी विनंतीही सरकारला केली होती.

द वायरने तापिर गांव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते एका बैठकीसाठी कोलकाता येथे उपस्थित असल्याचे कळाले. पण चीनच्या नव्या घुसखोरीबाबत अरुणाचल पूर्वचे काँग्रेसचे खासदार निनोंग इरिंग यांनी सरकार या घटनेची दखल घेईल का असा सवाल केला आहे.

काही दिवसांपूर्वी टाइम्स नाऊ समिट २०२१ या कार्यक्रमात तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख बिपीन रावत यांनी चीनच्या अशा घुसखोरीला फेटाळून लावले होते. चीनने स्वतःच्याच हद्दीत बांधकामे केल्याचे त्यांचे म्हणणे होते. रावत यांनी अमेरिकी संरक्षण कचेरी पेटँगॉनने भारतीय हद्दीत चीनने वस्त्या बांधल्याच्या म्हणण्यालाही फेटाळून लावले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: