हैदराबाद : तेलंगणमधील वारांगळ जिल्ह्यातील एका गावातल्या विहिरीत ९ जणांचे मृतदेह गुरुवारी संध्याकाळी आढळून आले. या मृतदेहांतील ६ मृतदेह एकाच कुटुंबातील
हैदराबाद : तेलंगणमधील वारांगळ जिल्ह्यातील एका गावातल्या विहिरीत ९ जणांचे मृतदेह गुरुवारी संध्याकाळी आढळून आले. या मृतदेहांतील ६ मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना वारांगळ जिल्ह्यात गोर्रेकुंटा गावात घडली. पोलिसांच्या मते मृतांमधील एक कुटुंब प. बंगालमधील असून ते अनेक वर्षे येथेच राहात होते. गुरुवारी संध्याकाळी गावकर्यांना विहिरीत मृतदेह दिसल्यानंतर पोलिस घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी गुरुवारी चार मृतदेह तर शुक्रवारी ५ मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. या ९ मृतदेहांवर एकही जखम वा मारहाणीची खूण आढळली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मूळचे प.बंगालमध्ये राहणारे मकसूद आलम व त्यांची पत्नी निशा २० वर्षे कामानिमित्त वारंगळ येथे आले होते व ते ज्यूटच्या पिशव्या तयार करण्याच्या कारखान्यात काम करत होते. आलम, निशा, त्यांची मुलगी, तीन वर्षाचा नातू, मुलगा सोहेल व शाबाद असे एका कुटुंबातील सदस्य असून त्रिपुराचे शकील अहमद, बिहारमधील श्रीराम व श्याम यांचे मृतदेह विहिरीत सापडले आहेत.
ही सामूहिक आत्महत्या नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही आत्महत्या असती तर एकाच कुटुंबातील सदस्यांनी केली असती पण या प्रकरणात अन्य व्यक्तींचाही समावेश असल्याने त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात येईल, असे पोलिस अधिक्षक श्याम सुंदर यांनी सांगितले.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मकसूद आलम आपल्या ६ नातेवाईकांसह करिमाबाद येथे भाड्याने राहात होता. लॉकडाऊननंतर आलमला आपले घर सोडावे लागले. त्यामुळे त्याने आपल्या मालकाकडे ज्यूट कारखान्यातील एका खोलीत राहण्याची विनंती केली होती. मालकाने विनंती मान्य केल्याने कारखान्याच्या गोदामात तळमजल्यावर आलम व त्याचे कुटुंबिय राहात होते तर वरच्या मजल्यावर बिहारमधील दोन कामगार राहात होते.
मूळ बातमी
COMMENTS