जामिया हिंसाचारः वर्षभरात एकही गुन्हा दाखल नाही

जामिया हिंसाचारः वर्षभरात एकही गुन्हा दाखल नाही

नवी दिल्लीः येथील प्रख्यात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गेल्या वर्षी पोलिसांनी हैदोस घातला होता व अनेक विद्यार्थ्यांना प्रचंड मारहाण केली होती,

अस्वस्थ करणारी कोरोनाकथा
पीपीई किट्सच्या खरेदीबाबत सरमा यांच्या खोट्या वल्गना?
लष्करातील महिलांसाठी शारिरीक क्षमतांचे निकष चुकीचे

नवी दिल्लीः येथील प्रख्यात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गेल्या वर्षी पोलिसांनी हैदोस घातला होता व अनेक विद्यार्थ्यांना प्रचंड मारहाण केली होती, या घटनेबाबत विद्यापीठ प्रशासनाने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली होती पण या तक्रारीचे फिर्यादीत अद्याप पोलिसांनी रुपांतर केलेले नाही.

जामियाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी द वायरला सांगितले की, पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराची फिर्याद होईल याची अपेक्षाही आता करणे आम्ही सोडून दिले असून त्याऐवजी मुलांच्या भविष्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणे हितावह आहे. आम्ही संबंधित मंत्रालयाला सांगितले आहे, त्यांना योग्य ती पावले उचलण्यासही सांगितले आहे. पण आमची एक मागणी होती की फिर्याद दाखल व्हावी, ती पोलिसांनी दाखल करून घेतलेली नाही. आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते पण अद्याप त्यातून काही ठोस आलेले नाही. त्यामुळे वेळ घालवण्यापेक्षा भविष्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे आम्ही ठरवले, असे अख्तर म्हणाल्या.

दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी घुसखोरी करून विद्यार्थ्यांना मारले व ग्रंथालयाची तोडफोड केली याबाबत न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. हा विषय आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे.

नेमके काय झाले होते?

गेल्या वर्षी १५ डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी जामियामध्ये घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली होती व विद्यापीठाच्या ग्रंथालयात व अन्य कार्यालयात घुसून मालमत्तेची नासधूस केली होती. जामिया प्रशासनाने नुकसान झालेल्या मालमत्तेची सविस्तर यादी मनुष्यबळ विकास खात्याला पाठवली होती. त्यात ४१ लाख २५ हजार रु.चे दरवाजे, २२ लाख ५ हजार रु. किमतीच्या खिडक्यांच्या काचा, १८ लाख रु.चे रेलिंग, १५ लाख रु.चे हार्डवेअर, १४ लाख रु.चे ग्रंथालयातील टेबल यांचा समावेश होता. त्याचबरोबर ७ लाख रु.च्या १७५ खूर्च्या, ६ लाख रु. शौचालयाची नासधूस, ७.५ लाख रु. झाडांचे नुकसान, ८ लाख रु.च्या फरशा, ४.५ लाख रु.चे अल्युमिनियमचे दरवाजे, २२.५ लाख रु. भिंतीवरच्या रंगाचे नुकसान असा खर्च लावण्यात आला होता.

नुकसानीच्या या यादीत १२ लाख ४० हजार रु.चे विजेचे दिवे, ३.८ लाख रु. स्टोन किपिंग, साडेपाच लाख रु.चे फॉल सिलिंग, अडीच लाख रु.चे कर्ब स्टोन, ७२,६३० रु.चे ७५ आरसे, ७२ हजार रु.चे १८० किमती ग्लास फिल्म यांचाही समावेश होता.

या घटनेचे काही व्हिडिओही प्रसिद्ध झाले होते त्यात पोलिस विद्यार्थ्यांवर हल्ला करताना दिसत होते. पण पोलिसांचा असा दावा होता की ते दंगलखोरांना शोधण्यासाठी कँपसमध्ये घुसले होते.

या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिस सायबर सेलकडे गेला होता पण त्या संदर्भात एकाही पोलिसाची ओळख पटलेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0