ओल्गा तोकार्कझूक व पीटर हांदके यांना साहित्याचा नोबेल

ओल्गा तोकार्कझूक व पीटर हांदके यांना साहित्याचा नोबेल

पोलंडच्या स्त्रीवादी साहित्यिक ओल्गा तोकार्कझूक व ऑस्ट्रियाचे साहित्यिक पीटर हांदके या दोघांची २०१८ व २०१९चा प्रतिष्ठेचा साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

ओल्गा यांचे साहित्य युरोपच्या जनमानसाचे प्रतिबिंब असून त्यांच्या साहित्यातून युरोपच्या सीमारेषा सहजपणे ओलांडल्या जातात. युरोपमधील पुराणमतवाद्यांचाही त्या समाचार घेतात, अशा शब्दांत नोबेल समितीने ओल्गा यांच्या साहित्याचा गौरव केला आहे. ओल्गा या प्रसिद्ध स्त्रीवादी साहित्यिक असून त्यांचा राजकीय उदारमतवाद त्यांच्या कलाकृतीतून मांडला गेलेला आहे. २०१८च्या मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कारासाठीही त्यांची निवड झाली होती. त्यांच्या ‘फ्लाइट’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला होता. मॅन बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलिश साहित्यिक होत्या. तर साहित्यातील नोबेल मिळवणाऱ्या त्या १५ व्या महिला कलावंत आहेत.

ऑस्ट्रियाचे नागरिक असलेले पीटर हांदके हे वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. युद्ध गुन्हेगाराचा ठपका असलेले युगोस्लाव्हियाचे माजी अध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिक यांच्या अंत्यसंस्काराला हांदके उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. हांदके यांची युगोस्लाव्ह युद्धाविषयीचे मतेही वादग्रस्त आहे. त्यांच्या ‘द गोएलीज अँक्झायटी ऍट द पेनल्टी किक’ व ‘स्लो होमकमिंग’ या साहित्यकृती विशेष करून गाजल्या होत्या.

COMMENTS