लखनौः उ. प्रदेशात परिवर्तनाची गरज आहे, मोदी सरकारमध्ये सामान्य माणूस, गरीब नव्हे तर अब्जाधीश सुरक्षित असल्याचा थेट आरोप रविवारी वाराणशी येथे काँग्रेसच
लखनौः उ. प्रदेशात परिवर्तनाची गरज आहे, मोदी सरकारमध्ये सामान्य माणूस, गरीब नव्हे तर अब्जाधीश सुरक्षित असल्याचा थेट आरोप रविवारी वाराणशी येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केला. वाराणशी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असून लखीमपुर खीरी येथील केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाकडून आंदोलक शेतकर्यांवर गाडी घालून त्यांना ठार मारण्याची दुर्दैवी घटना व त्यानंतर निर्माण झालेला तणाव यावर आक्रमक झालेल्या काँग्रेसने हल्लाबोल सुरू केला आहे.
रविवारी प्रियंका गांधी यांनी वाराणशीमध्ये रोड शो केला. या रोड शो मध्ये काँग्रेसने मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले. प्रियंका गांधी यांनी किसान न्याय रॅलीला संबोधन करताना मोदी, भाजप व उ. प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य नाथ यांच्यावर थेट टीका केली. लखीमपुर खीरीतील पीडितांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, केंद्रातील मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला कितीही मारा, तुरुंगात टाका, छळ करा पण आमचा संघर्ष कायम राहील असे प्रियंका गांधी म्हणाल्या. उ. प्रदेशात परिवर्तनाची गरज आहे, आम्हाला साथ द्या असेही त्या म्हणाल्या.
या देशात शेतकरी, दलित व महिला यांना अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. यातील कुणीही सुरक्षित नाहीत. पण या देशाचे पंतप्रधान, त्यांचे मंत्रिमंडळ, त्यांच्या पक्षातील माणसे व त्यांचे अब्जाधीश मित्र मात्र सुरक्षित आहेत. हे तुम्ही समजून घ्या. देशात रोजगार, उत्पन्नाची साधने शिल्लक राहिलेली नाहीत. हा देश उध्वस्त झाल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली.
वाराणशीच्या रोड शो आधी प्रियंका गांधी काशी विश्वनाथ व कुशमंदा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या सोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल होते.
मूळ बातमी
COMMENTS