एमपीएससी- बीएड सीईटी परीक्षार्थींना बॅच बदलण्याचा पर्याय

एमपीएससी- बीएड सीईटी परीक्षार्थींना बॅच बदलण्याचा पर्याय

मुंबई: एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्

सीईटीची पुन्हा संधी;९ व १० ऑक्टोबरला परीक्षा
एएनएम, जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही
१५ सप्टें. ते १० ऑक्टोबर दरम्यान सीईटी

मुंबई: एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देणार येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्ववारे विधानपरिषदेत व विधानसभेत दिली.

सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचमसीटी या दोन विषयाची परीक्षा २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरीत सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी [email protected] या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0