नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या पत्रकार मारिया रेसा यांनी स्थापन केलेल्या 'रॅपलर' या स्वतंत्र वृत्तसंस्थेवर फिलीपाईन्स सरकारने विदेशी गुंतवणूकदारांनी नियंत्रण ठेवल्याचा आरोप केला आहे. रॅपलरने या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगितले आहे.
नवी दिल्ली : नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या मारिया रेसा यांनी स्थापन केलेली ‘रॅपलर’ ही स्वतंत्र वृत्तसंस्था बंद करण्याचे आदेश फिलीपाईन्स सरकारने दिले आहेत.
रेसा अमेरिकेत यांनी एका आंतरराष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्समध्ये यासंदर्भात माहिती दिली.
फिलीपाईन्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (PSEC) ने न्यूज वेबसाइटचा ऑपरेटिंग परवाना रद्द करण्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवला आहे.
अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दोन दिवसांत हा निर्णय घेण्यात आला होता.
दुतेर्ते यांनी वारंवार रेसा आणि रॅपलर यांना लक्ष्य केले होते. या वृत्त वेबसाईटने आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बातमीदारी केली आहे. बंदीच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे रॅपलरने जाहीर केले आहे.
२९ जून रोजी जारी केलेल्या आपल्या निवेदनात रॅपलरने म्हणले आहे, “देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचण्यासाठी आमच्याकडे सर्व कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत. सरकारच्या अशा कारवाया आमच्यासाठी सर्रास झाल्या आहेत, आमच्या दृष्टीने न्यायालयाच्या मंजुरीशिवाय हा (आदेश) लगेच लागू होणार नाही.”
त्याच्या वेबसाइटवरील एका वृत्तात रॅपलरने नमूद केले आहे की जुलै २०१८मध्ये, कोर्ट ऑफ अपील (CA) ने एक निर्णय दिला होता. ज्यामध्ये फिलीपाईन्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (PSEC) च्या निष्कर्षांचा समावेश आहे. फिलीपाईन्स घटनेनुसार मीडिया कंपन्यांवर शून्य विदेशी नियंत्रण हवे. रॅपलर विदेशी गुंतवणूकदारांद्वारे नियंत्रित आहे. निकालात म्हटले आहे की रॅपलरने विदेशी गुंतवणूकदार ओमिड्यार यांना फिलिपाईन डिपॉझिटरी रिसीट्स (पीडीआर) जारी केले होते.
“परंतु त्याच निर्णयात, सीएने सांगितले की जेव्हा ओमिड्यारने आपला पीडीआर रॅपलरच्या फिलिपिनो व्यवस्थापकाला दान केला, तेव्हा एसईसीला आक्षेपार्ह असल्याचे आढळलेले नकारात्मक विदेशी नियंत्रण कायमचे संपले आहे,” असे अहवालात म्हटले आहे.’
फिलीपाईन्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन आपल्या भूमिकेवर ठाम राहिली, म्हणून रॅपलरने त्याविरुद्ध अपील केले. याच अपिलावर नुकताच आदेश आला आहे.
वेबसाइटने म्हटले आहे की, स्वतःला जिवंत ठेवू आणि पुन्हा उभे राहू.
८ जून रोजी देशाच्या दूरसंचार संस्थेने देशातील अनेक स्वतंत्र मीडिया वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हर्मोजेनेस एस्पेरॉन यांच्या सूचनेनुसार हा आदेश देण्यात आला आहे.
ब्लॉक केलेल्या साइट्समध्ये स्वतंत्र न्यूज प्लॅटफॉर्म तसेच सेव्ह अवर स्कूल नेटवर्क, फिलीपाईन्सचे ग्रामीण मिशनरी यांसारखे प्रगतीशील गट समाविष्ट आहेत.
COMMENTS