चन्नी हेच पंजाब मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

चन्नी हेच पंजाब मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षातर्फे चरणजीत सिंग चन्नीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा रविवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांध

मणिपूरमध्ये भाजपचे सरकार अल्पमतात
ज्योतिरादित्य शिंदेनी काँग्रेस सोडण्यामागची १० कारणे
राहुल गांधींना जाहीर पत्र

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षातर्फे चरणजीत सिंग चन्नीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा रविवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांच्या या घोषणेनंतर पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पण शनिवारी सिद्धू यांनी आपल्याला पदाची आस नाही, पक्ष जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल असे जाहीर केले होते. पंजाबचे कल्याण व्हावे, प्रगती व्हावी अशी आपली इच्छा असल्याचे सिद्धू म्हणाले होते. त्यानंतर घडामोडी झाल्या.

रविवारी लुधियाना येथे काँग्रेसची व्हर्चुअल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला सिद्धूही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पंजाबमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास चन्नीच मुख्यमंत्री असतील असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. पंजाबच्या जनतेला गरीब घरातील उमेदवारच आपला मुख्यमंत्री हवा आहे, असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी निर्णयाची घोषणा करताना दिले.

चन्नी यांची घोषणा करण्याआधी पक्षाने राज्यातील पक्षकार्यकर्ते, नेते यांची मते अजमावली व त्या नंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारीला मतदान होत आहे. व निकाल १० मार्चला जाहीर होणार आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0