रोकड नेणारे झारखंड काँग्रेसचे ३ आमदार निलंबित

रोकड नेणारे झारखंड काँग्रेसचे ३ आमदार निलंबित

नवी दिल्लीः प. बंगालमधील हावडा येथे ३० जुलैला एका कारमध्ये लाखो रुपयाची रोकड सापडल्यानंतर काँग्रेसने झारखंडमधील आपल्या तीन आमदारांना निलंबित केले. तसा

ग्रामीण मतदाराचा बदलता कौल
‘रेड राज’ सुरूच – काँग्रेसने  
फडणवीसांची बखर – ३ : मी पुन्हा जाईन

नवी दिल्लीः प. बंगालमधील हावडा येथे ३० जुलैला एका कारमध्ये लाखो रुपयाची रोकड सापडल्यानंतर काँग्रेसने झारखंडमधील आपल्या तीन आमदारांना निलंबित केले. तसा आदेश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जारी केला आहे. सध्या या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लाखो रु.ची रोकड ही झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी वापरण्यात येणार होती व भाजपचा हा कट असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आमदारांची नावे इरफान अन्सारी, राजेश कच्छप व नमन बिकसल कोंगारी अशी असून हे आमदार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१६ वर राणीहाती येथे जात असताना त्यांच्या कारमध्ये रोकड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून पोलिसांनी गाडी अडवली. या गाडीची झडती घेतली असता लाखो रुपये सापडले.

अन्सारी हे जमतारा, कच्छप हे खिजरी व कोंगारी हे कोलेबिरा या मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदारांच्या गाडीत रोकड सापडल्यानंतर शनिवारी रात्री काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट करून भाजपचे ऑपरेशन लोटस उघडकीस आले असा दावा केला. हा खेळ दिल्लीतील दोघांचा (हम दो) असून महाराष्ट्रात जसा ‘ईडी’चा डाव भाजपने खेळला तसा खेळ झारखंडमध्ये सुरू झाल्याचा आरोप रमेश यांनी केला.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनीही भाजपवर आरोप केला. ज्या राज्यात भाजप सत्तेत नाही व तेथे ते निवडून येऊ शकत नाहीत, त्या राज्यात भाजप अशा कारवाया करत असल्याची टीका त्यांनी केली. भाजप सर्व तपास यंत्रणांना आपल्या फायद्यासाठी वापरून घेत आहे, असेही ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0