प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण समितीवरून हकालपट्‌टी

प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण समितीवरून हकालपट्‌टी

नवी दिल्ली : म. गांधी यांचे मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेला बुधवारी लोकसभेत देशभक्त म्हणणाऱ्या भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांची भाजपने संसदेच्या सं

काँग्रेसच्या रजनी पाटील राज्यसभेवर बिनविरोध
कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपची सरशी
भीमा-कोरेगाव : बचाव पक्षाला पुराव्याच्या प्रती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

नवी दिल्ली : म. गांधी यांचे मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेला बुधवारी लोकसभेत देशभक्त म्हणणाऱ्या भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांची भाजपने संसदेच्या संरक्षण समितीवरून हकालपट्‌टी केली आहे. भाजपने हे संसद अधिवेशन होईपर्यंत त्यांना भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीतही उपस्थित राहण्यास मनाई केली आहे. गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरू होण्याअगोदर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्‌डा यांनी भाजप प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानांचे समर्थन करत नसून आमच्या पक्षाची विचारसरणीच्याही विपरीत हे विधान आहे. त्यामुळे त्यांना संसदेच्या संरक्षण समितीवरून ताबडतोब हटवणयाचा निर्णय घेतला आहे.

जे. पी. नड्‌डा यांच्याबरोबर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाची आम्ही निषेध करत असून आम्ही अशा विचारधारेला पाठिंबा देत नाही असे स्पष्ट केले.

गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा उपस्थित करत संसद अशी विधाने करण्यास परवानगी कशी देते असा सवाल केला. ज्या पक्षाचे शेकडो नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आपले बलिदान दिले आहे, त्या पक्षाला प्रज्ञा ठाकूर दहशतवादी कसे म्हणू शकतात? संसद यावर नेहमी मौन पाळणार का? असा प्रश्न केला.

त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रज्ञा ठाकूर यांचे विधान लोकसभेच्या कामकाजातून वगळले असल्याने या विषयावर अधिक चर्चा करण्यात काही अर्थ नाही असे स्पष्ट केले. नंतर लोकसभेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाला आपला पक्ष व विचारसरणीचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. म. गांधी आमच्यासाठी पूर्वी मार्गदर्शक होते व आजही आहेत, गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या नेत्यांचे विचार आमच्या पक्षाचे कदापी नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान संसदीय समितीवरून हकालपट्‌टी झाल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी आपले देशभक्ती संदर्भातील विधान नथुराम गोडसे याच्याबाबत नव्हते तर ते शहीद उधमसिंग यांच्या कार्याला उद्देशून होते असा दावा केला आहे. त्यांनी ‘कभी-2 झूठ का बवंडर इतना गहरा होता है कि दिन में भी रात लगने लगती है, किंतु सूर्य अपना प्रकाश नहीं खोता. पलभर के बवंडर मे लोग भ्रमित न हों, सूर्य का प्रकाश स्थाई है. सत्य यही है कि कल मैने ऊधम सिंह जी का अपमान नहीं सहा बस.’ असे ट्विटही केले आहे.

बुधवारी एसपीजी सुरक्षा नियमातील काही बदलांवर लोकसभेत चर्चा सुरू असताना या चर्चेत द्रमुकचे नेते ए. राजा यांनी नेत्यांची सुरक्षा काढण्याच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णयावर टीका केली. या टीकेत ए. राजा यांनी म. गांधी यांच्या हत्येचा संदर्भ वाचून दाखवला. त्यात ते म्हणाले, ‘नथुराम गोडसेच्या मनात ३२ वर्षे म. गांधींविषयीची घृणा होती आणि या घृणेतून त्याने म. गांधींची हत्या केली. ’

ए. राजा यांच्या या विधानावर समोरच्या आसनावर बसलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत ‘देशभक्तों का उदाहरण मत दिजिए’ असे वाक्य उच्चारले, त्यावर द्रमुकच्या सदस्यांनी व नंतर सर्व सदस्यांनी आक्षेप घेतला. नंतर गोंधळ वाढत असलेला पाहून लोकसभा सभापतींनी ठाकूर यांचे वादग्रस्त विधान कामकाज नोंदीतून वगळण्याचे आदेश दिले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: