प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील भूमिकेवर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील भूमिकेवर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार

नवी दिल्लीः निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश नक्की झाल्याचे वृत्त असून २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांत त्यांची पक्षांमार्फत कोण

४ सदस्यांची टीम सोनियांना साह्य करणार
मध्यप्रदेश काँग्रेसद्वारे रामनवमी, हनुमानजयंती साजरी करण्याच्या सूचना
एकीचे ‘उत्तर’

नवी दिल्लीः निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश नक्की झाल्याचे वृत्त असून २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांत त्यांची पक्षांमार्फत कोणती भूमिका असेल याचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी घेणार आहेत. मंगळवारी काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली. सोनिया गांधी यांनी सोमवारी संध्याकाळी

पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांशी प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसप्रवेशाबाबत चर्चा केली. या चर्चेत सोनिया गांधी हे प्रशांत किशोर यांना पक्षात कोणती भूमिका देणार याचा निर्णय घेतील यावर सहमती झाली.

प्रशांत किशोर यांच्याशी काँग्रेस अध्यक्षांनी तीनवेळा चर्चा केली. या बैठकीत राहुल गांधी उपस्थित नव्हते पण प्रियंका गांधी उपस्थित होत्या.

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर २०२४च्या सार्वत्रिक निवडणुका व येत्या दोन वर्षांत होणाऱ्या विविध राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेससाठी रणनीती आखणार आहेत. त्यांचा काँग्रेस प्रवेश लवकरच होईल असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे एक पॅनेल प्रशांत किशोर यांच्या योजनांवर आठवडाभर चर्चा करणार आहे.

प्रशांत किशोर यांनी येत्या ३ मे नंतर आपण निर्णय जाहीर करणार असल्याचे या पूर्वी काही मुलाखतींत सांगितले आहे.

एएनआयने काही सूत्रांच्या दिलेल्या हवाल्यानुसार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला उ. प्रदेश, बिहार व ओदिशा या राज्यांत स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा तर तामिळनाडू, प. बंगाल व महाराष्ट्रात अन्य घटक पक्षांशी युती करावी असा सल्ला दिला आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0