पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे आज दुपारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त
पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे आज दुपारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी येथील कोल्हापूर येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नारायण ज्ञानदेव पाटील यांना एन. डी. पाटील या नावाने संपूर्ण महाराष्ट्र ओळखत होता. कष्टकरी, वंचित, कामगार, मोलकरणी अशा सर्वांसाठी त्यांनी अखेरपर्यंत काम केले.
१५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए आणि एल.एल.बी हे शिक्षण घेतले होते.
एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. सीमा लढ्याचे प्रणेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
१९५४- १९५७ या काळात छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे ते प्राध्यापक होते. ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टरही होते. १९६० साली ते कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य झाले.
१९४८ त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. १९५७ साली मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस होते. १९६९- १९७८, १९८५ – २०१० या काळात ते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस होते. १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. १९७८-१९८० या काळामध्ये ते महाराष्ट्राचे सहकारमंत्री होते. १९८५-१९९० या काळामध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. १९९९-२००२ या कालावधीमध्ये राज्यातील लोकशाही आघाडी सरकारचे निमंत्रक म्हणून त्यांनी काम केले.
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य
शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
पुरस्कार/ सन्मान
भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
एन. डी. यांचे लेखन
समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )
COMMENTS