नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण करून त्यातून चार नव्या बँकांच्या निर्मि
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण करून त्यातून चार नव्या बँकांच्या निर्मितीची घोषणा केली.
या घोषणेनुसार ओरिंएटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक व पंजाब नॅशनल बँकेचे विलिनीकरण होईल. ही बँक देशातील दुसरी मोठी सार्वजनिक बँक असेल. त्याचबरोबर केंद्राने कॅनरा बँक व सिंडिकेट बँक यांचे विलिनीकरण, युनियन बँक, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक आणि इंडियन बँक, अलाहाबाद बँक यांचे विलिनीकरण होईल असे जाहीर केले आहे.
सरकारच्या या धोरणामुळे या बँकांतील कर्मचाऱ्यांची मात्र कपात केली जाणार नाही असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले. बँकांच्या विलिनीकरणामागील कारण देताना अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व पाच ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
COMMENTS