नवी दिल्ली : ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची स्वप्ने दाखवणाऱ्या मोदी सरकारला शुक्रवारी धक्का बसला. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून
नवी दिल्ली : ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची स्वप्ने दाखवणाऱ्या मोदी सरकारला शुक्रवारी धक्का बसला. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशाचा आर्थिक विकास दर ५.८ टक्क्यांवरून घसरून ५ टक्क्यांवर आला. औद्योगिक व कृषी क्षेत्रात वृद्धी न झाल्याने हा आर्थिक विकासदर खालावला आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली. हा विकास दर गेल्या सहा वर्षांतला सर्वात निच्चांकी आहे.
मोदी सरकारची ही दुसरी कारकीर्द सुरू असून यूपीए-२च्या २०१३-१४ या काळात जानेवारी ते मार्च या तिमाहीत विकासदर ५.३ टक्के होता त्यापेक्षा मोदी सरकारचा हा दर खाली आहे.
आर्थिक विकासदर खालावल्यामागे वस्तूंची मागणी घसरणे आणि गुंतवणुकीसाठी देशात योग्य परिस्थिती नसणे ही सुद्धा कारणे आहेत.
तरीही देशाचे आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांनी अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
२०१७-१८मध्ये आर्थिक विकास दर ७.२ होता तो २०१८-१९ या काळातला आर्थिक विकासदर ६.८ टक्के असा घसरला होता. मोदी सरकार २०१४मध्ये सत्तेत आले होते त्यानंतर आर्थिक विकासदर खालावत चालला आहे.
COMMENTS