‘विश्वसनीय माहिती मिळूनही पुलवामा हल्ला झाला’

‘विश्वसनीय माहिती मिळूनही पुलवामा हल्ला झाला’

नवी दिल्लीः फेब्रुवारी २०१९मध्ये सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेल्या पुलवामा घटनेसंदर्भात एक नवी माहिती उघडकीस आली आहे. पुलवामामध्ये भारतीय सुरक्षा यंत्र

३७० कलमाच्या विरोधातील याचिकेतून नाव मागे घेण्यासाठी शाह फैजल यांचा अर्ज
काश्मीरमध्ये माध्यमांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पत्रकारांचा अपमान
इंटरनेट बंद असल्याने मीडियाचे हाल – काश्मीर प्रेस क्लब

नवी दिल्लीः फेब्रुवारी २०१९मध्ये सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेल्या पुलवामा घटनेसंदर्भात एक नवी माहिती उघडकीस आली आहे. पुलवामामध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो याची माहिती गुप्तचर खात्याकडून २ जानेवारी २०१९ ते १३ फेब्रुवारी २०१९ या काळात जम्मू व काश्मीर राज्याच्या पोलिसांसह अन्य सर्व अंतर्गत सुरक्षा यंत्रणांना पाठवण्यात आली होती. पण या माहितीच्या आधारावर आपल्या सुरक्षा यंत्रणा अगोदरच हल्ला रोखू शकल्या नाहीत किंवा त्यांना हल्ला रोखता आला नाही, असा इन्व्हेस्टिगेटिंग रिपोर्ट फ्रंटलाइन या मासिकाने प्रसिद्ध केला आहे.

या रिपोर्टमध्ये गुप्तचर यंत्रणेकडून दोन अशा पक्क्या खबरी आल्या होत्या की त्या माहितीनुसार वेळीच कारवाई केली असती तर दहशतवादी हल्ला रोखता आला असता, असे म्हटले आहे.

एखाद्या गुप्त माहितीमध्ये दहशतवाद्यांचा तळ, त्यांची ओळख किंवा त्यांच्या कारवायांसंदर्भात तपशील असेल तर त्या माहितीवर तत्काळ कारवाई करणे महत्त्वाचे असते, असे इन्स्टिट्यूट ऑफ कन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक अजय सहानी यांचे मत आहे.

 

खाली नेमकी कोणती गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना पाठवली गेली होती, ती विस्तृत दिली आहे. 

२ जानेवारी २०१९- पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा येथे ४ दहशतवाद्यांच्या हत्येचा बदला म्हणून जैश-ए-मोहम्मदकडून दक्षिण काश्मीरमध्ये ‘कैसास मोहीम’ हाती घेतली जाणार असल्याची माहिती जम्मू व काश्मीरचे पोलिस महासंचालक, महानिरीक्षक यांना पाठवली होती व दहशतवाद्यांच्या या धमकीची सत्यता तपासून पाहावी असे सांगण्यात आले होते.

२०१७मध्ये भारतीय लष्कराने काश्मीर खोर्यातील सर्व दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी महत्त्वाकांक्षी अशी ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहीम हाती घेतली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून जैशने ‘कैसास मोहीम’ हाती घेतली होती.

 

३ जानेवारी २०१९-  या दिवशी दहशतवादी हल्ल्याचा होणारा धोका व्यापक प्रमाणात सुरक्षा यंत्रणांना विशद करण्यात आला होता. हा हल्ला अत्यंत गंभीर असू शकतो, असे सांगण्यासाठी २०१८मध्ये ‘कैसास मोहिमे’अंतर्गत केलेल्या एका हल्ल्याचा संदर्भ देण्यात आला होता.

२०१८मध्ये जैश ए मोहम्मदने पुलवामातील नेवा येथील सीआरपीएफच्या १८३ बटालियनवर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी लष्कराचा एक खबर्या मुश्ताक अहमद मीर याचे अपहरण केले होते व काही दिवसांनी सोपोर येथील सीआरपीएफचे एसओ रसूल मीर यांची हत्या केली होती.

फ्रंटलाइनने २०१८च्या ‘कैसास मोहीम’चा उल्लेख आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे.

 

७ जानेवारी २०१९- दक्षिण काश्मीरमध्ये आयडी पेरण्यासाठी काही स्थानिक युवक व परदेशी भाडोत्री दहशतवाद्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी पाठवली होती.

या माहितीत, शोपियन जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा एक गट यात एक दहशतवादी परदेशी भाडोत्री असून त्यांनी काही स्थानिक तरुणांना स्फोटके पेरण्याचे, आयडी तयार करण्याचे, हातबॉम्ब फेकण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

 

१८ जानेवारी २०१९- या दिवशी सुमारे २० स्थानिक दहशतवादी काही परदेशी भाडोत्री दहशतवाद्यांच्या सूचनांनुसार पुलवामा येथील अवंतीपुरा भागात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना पाठवण्यात आली होती.

 

२१ जानेवारी २०१९ –  या दिवशी ‘कैसास’ हल्ला होऊ शकतो असे पुन्हा पुन्हा सांगण्यात आले. हा हल्ला थोपवण्यासाठी दहशतवादविरोधी यंत्रणांनी समन्वय साधावा व पावले उचलावीत, असे स्पष्ट करण्यात आले होते. मसूद अझहरचा पुतण्या तल्हा रशीद याच्या हत्येचा बदला म्हणून हा हल्ला जैश ए मोहम्मदकडूनच होऊ शकते, असे ठळक शब्दांत अधोरेखित करून सुरक्षा यंत्रणांना सांगण्यात आले होते.

 

२४ जानेवारी २०१९-  जैशचा एक दहशतवादी मुदस्सीर खान याच्या नेतृत्वाखाली फिदायिन हल्ला होणार आहे, असे विशेष नमूद करून सांगण्यात आले होते. नंतर मुदस्सीर खान हाच पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता, असे स्पष्ट झाले.

मुदस्सीर खान याने जैशच्या राजपुरा पुलावामा येथील कार्यरत अन्य एक दहशतवादी गट शाहीद बाबा याची मदत घेतल्याचे गुप्तचर संदेशात नमूद करण्यात आले होते.

 

२५ जानेवारी २०१९- या दिवशीच्या गुप्तचर संदेशात मुदस्सीर खान याचा नेमका ठावठिकाणा ठळक शब्दांत सांगण्यात आला होता. मुदस्सीर खान काही परदेशी भाडोत्री दहशतवाद्यांसोबत मिदूरा व लाम त्राल या गावांत दिसून आल्याचे नमूद करण्यात आले होते.

या काळात हल्ला करण्याची सर्व तयारी दहशतवाद्यांकडून झाली होती. हा हल्ला अवंतीपोरा किंवा पंम्पोर येथून केला जाणार होता.

फ्रंटलाइनच्या मते २४ जानेवारी व २५ जानेवारी या दोन दिवसांत दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यासाठी पावले उचलली असती तर अनर्थ टाळता आला असता. मुदस्सीर खानला ताब्यात घेता आले असते व ३ आठवड्यांनी होणारी दुर्दैवी घटना टाळता आली असती.

 

९ फेब्रुवारी २०१९- अफझल गुरुच्या फाशीचा बदला म्हणून जैश ए मोहम्मदकडून हल्ला होणार असा पुन्हा संदेश एडीजी, सीआरपीएफ, जेअँडके झोन व अन्य सुरक्षा यंत्रणांना पाठवण्यात आला.

 

१२ फेब्रुवारी २०१९- ट्विटरवरील Shah GET 313 @313_get. या हँडलचा हवाला देत गुप्तचर खात्याने टॉप सिक्रेट मॅटर मोस्ट अर्जंट असा स्पष्ट संदेश सुरक्षा यंत्रणांना पाठवला होता. या ट्विटर हँडलवर १२ फेब्रुवारी प्रसिद्ध झालेल्या मजकुरातून दहशतवादी हल्ला होणार याचे सूचन केले गेले होते. हे ट्विटर हँडल विविध गुप्तचर यंत्रणांच्या अनेक दिवस नजरेत होते.

 

१३ फेब्रुवारी २०१९-  जम्मू व काश्मीरमधील सुरक्षा दलाच्या जवानांची वाहतूक केल्या जाणार्या मार्गांवर दहशतवादी हल्ला होणार असा अंतिम इशारा १३ फेब्रुवारी २०१९रोजी देण्यात आला होता. त्यानंतर पुढच्या दिवशी १४ फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर फिदायिन हल्ला झाला.

 

मुदस्सीर खान याचा पूर्व इतिहास

२०१७मध्ये द. काश्मीरच्या लेथपोरा येथील सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान ठार झाले होते. हा हल्ला मुदस्सीर खान याने घडवून आणला होता. मुदस्सीर द. काश्मीरमध्ये जैश संघटना सांभाळत होता. त्या अगोदर या भागातील संघटना शाहीद बाबा हा चालवत होता. पण १ फेब्रुवारी २०१९मध्ये शाहीद बाबा चकमकीत मारला गेल्यानंतर द. काश्मीरमधील जैशची जबाबदारी मुदस्सीर याच्याकडे देण्यात आली होती.

१४ फेब्रुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करणारा दहशतवादी १९ वर्षांचा अदिल अहमद दार हा होता. दार यालाच मुदस्सीर याने हल्ला करण्याचे आदेश दिले होते, असे फ्रंटलाइनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

मुदस्सीर व शाहीद बाबा यांच्याकडून हल्ले होणार याची माहिती २२ जानेवारीला पुलवामा येथील काही खबर्यांकडून मिळाली होती, असे फ्रंटलाइनच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मुदस्सीर खान हाच पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे नंतर स्पष्ट झाले. हा मुदस्सीर खान पुढे ११ मार्च २०१९ रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला.

पुलवामा हल्ला होण्याच्या एक दिवस अगोदर अवंतीपोरा जिल्हा पोलिस प्रमुख मोहम्मद झैद यांची बदली करण्यात आली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: