भाजपला मत देईनः मायावतींची अखिलेशला धमकी

भाजपला मत देईनः मायावतींची अखिलेशला धमकी

लखनौः उ. प्रदेशच्या १० राज्यसभा जागांवर होणार्या निवडणुकांअगोदर बहुजन समाज पार्टीच्या ७ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर गुरुवारी पक्षाच्या अध्यक्ष मायावत

उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय आत्मघातकी
सपाकडून डॉ. कफील खान यांना विधान परिषदेचे तिकीट
‘सपा’वरील हल्ल्यातून ‘बसपा’चे पुनरुज्जीवन

लखनौः उ. प्रदेशच्या १० राज्यसभा जागांवर होणार्या निवडणुकांअगोदर बहुजन समाज पार्टीच्या ७ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर गुरुवारी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना थेट लक्ष्य केले.

आपल्या पक्षातील आमदारांची बंडखोरी व या १० जागांपैकी एका जागेवर बसपाच्याविरोधात एका अपक्ष उमेदवाराला सपाने उमेदवारी दिल्यानंतर भडकलेल्या मायावतींनी उ. प्रदेश विधान परिषदेतील निवडणुकांत प्रसंगी सपाला धडा शिकवण्यासाठी भाजपला मत देईन, अशी धमकी दिली.

बसपाच्या ७ आमदारांनी अखिलेश यादव यांची भेट घेतल्याने तसेच राज्यसभेच्या एका जागेसाठी उभे राहिलेल्या बसपाच्या एका उमेदवाराचे अनुमोदन करणार्या १० पैकी ५ जणांनी आपले नाव मागे घेतल्याने हा वाद चिघळला.

मायावतींनी सपाशी केलेल्या युतीवरही विधान करताना आपला निर्णय चुकला अशी कबुली दिली. १९९५चे गेस्ट हाउस कांडसंदर्भातील खटला आपण मागे घेतला ही चूक होती, असेही त्या म्हणाल्या.

मायावतींच्या या विधानानंतर पक्षाचे महासचिव सतीश मिश्रा यांनीही उमेदवारांचा घोडेबाजार करण्यात सपा नेहमीच पुढे असतात, त्यांच्या अशा राजकारणामुळे देशातील व राज्यातील जनता या पक्षाची छी थू करेल असे ते म्हणाले. 

सपाचा मायावतींना शह

उ. प्रदेशाच्या १० राज्यसभा जागांसाठी ९ नोव्हेंबरला निवडणुका होत असून त्यातील ८ जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे. भाजपकडून हरदीप सिंह पुरी, अरुण सिंह, हरिद्वार दुबे, माजी डीजीपी बृजलाल, नीरज शेखर, गीता शाक्य, बीएल वर्मा, सीमा द्विवेदी यांची नावे आहेत. त्याचबरोबर भाजपकडे आपल्या उमेदवारांना विजय देऊन २५ मते अतिरिक्त आहेत. पण त्यांनी आपला ९ वा उमेदवार उभा केलेला नाही. उ. प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी ३६ मतांची गरज आहे. भाजपकडे ३०२ आमदार असून १६ अन्य आमदारांचे समर्थन आहे. बसपाकडे १८ आमदार आहेत व त्यांनी रामजी गौतम यांना उमेदवारी दिली आहे. पण बसपाचे तीन आमदार मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे भाजप मायावतींना मदत करणार असल्याचे बोलले जात आहे. अशावेळी बसपाची एक जागा निश्चित वाटत असताना सपाने अपक्ष उमेदवार प्रकाश बजाज यांना उभे केले व त्यानंतर बसपाच्या ७ आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली.

या बंडखोरीनंतर मायावतींनी या सर्व आमदारांना पक्षातून निलंबित केले व आपल्याच उमेदवाराविरोधात बंड केल्याचा आरोप केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: