नवी दिल्ली : सीबीआयचे माजी प्रमुख राकेश अस्थाना यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला आणखी दोन महिन्यांचा अवधी दिली आहे. या दोन महिन्यात सीबीआय चौकशी करू शकली नाही तर पुन्हा वेळ वाढवून दिला जाणार नाही, असे न्या. विभू बाखरू यांनी स्पष्ट केले.
अस्थाना यांची चौकशी करण्यासाठी आणखी वेळ हवा म्हणून सीबीआयने याचिका दाखल केली होती. अस्थाना भ्रष्टाचार प्रकरणात अमेरिका व संयुक्त अरब अमिरात येथून काही न्यायिक मदत मागण्यात आली आहे पण ती मिळाली नसल्याने चौकशीचा कालावधी वाढवून द्यावा अशी विनंती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजीत बॅनर्जी यांनी न्यायालयाला केली. ती न्यायालयाने मान्य केली.
अस्थाना यांची चौकशी गेल्या जानेवारीपासून सुरू होती व ती १० आठवड्यात करणे अपेक्षित होते पण सीबीआयने या अगोदर तीन वेळा चौकशीचा कालावधी वाढवून घेतला आहे आणि तो सीबीआयला मिळालाही होता. पण सीबीआय अस्थाना यांच्या भ्रष्टाचाराच्या मुळाशी अद्यापी जाऊ शकलेली नाही.
मूळ बातमी
COMMENTS