बिल्कीस बानू प्रकरणः महत्त्वाच्या साक्षीदाराला दोषीकडून धमकी

बिल्कीस बानू प्रकरणः महत्त्वाच्या साक्षीदाराला दोषीकडून धमकी

नवी दिल्लीः गुजरात दंगलीतील बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील एक दोषी राधेश्याम शहा याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार या प्रकरणातील महत

भाजप आमदार म्हणाले- बिल्कीस प्रकरणातील दोषी चांगले संस्कार असलेले ब्राह्मण
बिल्कीसला न्याय मिळवून देणे ही आता भारताची जबाबदारी
बिल्कीस बानोच्या समर्थनार्थ पदयात्राः ७ जणांना अटक

नवी दिल्लीः गुजरात दंगलीतील बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील एक दोषी राधेश्याम शहा याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार इम्तियाझ घांची (४५) याने सरन्यायाधीशांकडे केली आहे. तसे एक पत्र घांची याने सरन्यायाधीश यू. यू. लळित यांना पाठवल्याचे वृत्त द क्विंटने दिले आहे. घांची याने केवळ सरन्यायाधीशच नव्हे तर गुजरातचे गृहसचिव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, अनेक प्रशासकीय-पोलिस अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपल्या शहा याच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

गेल्या १५ सप्टेंबरला राधेश्याम शहा याने आपल्याला गाव सोडून जात नाहीपर्यंत काळानिळा होईल इतके मारू अशी धमकी दिल्याचे घांची याचे म्हणणे आहे.

१५ सप्टेंबरला घांची याची पिपलोड रेल्वे बॅरिकेड येथे शहा याच्याशी नजरानजर झाली. त्यावेळी घांची आपल्या मोटार सायकलवरून देवगड बारीया या आपल्या गावाकडे जात होता. पण मध्ये रेल्वे फाटक असल्याने तो सिग्नलवर थांबला असता शहा याने घांची याला पाहिले आणि त्याला खुणेने जवळ बोलावले. घांची शहाच्याजवळ आला. शहा आपल्या कारमध्ये बसला होता. त्याने आता आपण तुरुंगातून बाहेर आलेलो असून तुम्हा लोकांना (घांची) मारून गावाबाहेर हाकलून देणार अशी धमकी दिल्याचे घांचीचे म्हणणे आहे.

२००२च्या गुजरात दंगल उसळल्यानंतर घांची याने आपल्या कुटुंबासह  सिंगवाड (रंधिकपूर) येथून देवगढ बरिया या गावाकडे पलायन केले होते. त्यानंतर तो आजही आपली पत्नी व मुलांसह तेथेच राहतो. गुजरात दंगलीनंतर पुन्हा गावाकडे जाण्यास भीती वाटते. आपण रोजंदारीवर काम करत असल्याने अनेकदा कामासाठी गावागावांत फिरावे लागते असे घांची याचे म्हणणे आहे.

गोध्रा हत्याकांड प्रकरणात घांची याने साक्षीदार म्हणून सीबीआयकडे जबाब नोंदवला होता. गोध्रा हत्याकांडातील एक आरोपी नरेश मोडधिया (आता मृत) याच्या हातात दंगलीदरम्यान रामपुरी चाकू होता, अशी साक्ष घांची याने दिली होती. तसेच घांची याने दंगलीतील अन्य एक आरोपी प्रदीप मोडधिया हा रंधिकपूर येथे काही घरांवर दगडफेक करत होता व घोषणा देत असल्याचा जबाब न्यायालयापुढे दिला होता.

मुख्य वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0