मागच्या वर्षात रुपयाची कामगिरी खराब

मागच्या वर्षात रुपयाची कामगिरी खराब

डिसेंबर २०१८ पासून रुपया डॉलरच्या तुलनेत २% ने घसरला आहे. आशियामध्ये फक्त पाकिस्तानी रुपया आणि दक्षिण कोरियाचा वॉन यांची कामगिरी भारतीय रुपयापेक्षा खराब आहे.

बारावीचे समाजशास्त्राचे पुस्तक की सामान्यज्ञान?
प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक जफर पनाहींना ६ वर्षांचा तुरुंगवास
भारताचे स्वावलंबन आणि राजकारण…!

मुंबई:आर्थिक वृद्धीमध्ये तीव्र घसरण आणि चलनवाढीमध्ये मोठी वाढ यामुळे रुपयाच्या विनिमय दरावर परिणाम दिसू लागला आहे. मागच्या वर्षात आशियामध्ये केवळ दक्षिण कोरियाचा वॉन आणि पाकिस्तानचा रुपया यांचा अपवाद वगळता भारतीय रुपयाची कामगिरी इतर सर्व देशांपेक्षा खराब राहिली आहे.

जानेवारी २०१९ पासून भारतीय रुपया यूएस डॉलरच्या तुलनेत २% ने घसरला आहे. इतर देशांचा विचार करता थाई बाथ ६.३% वर गेला आहे, मलेशिय रिंगिट १.५% ने वर गेला आहे आणि फिलिपिन्स पेसो सुद्धा या कालावधीत यूएस डॉलरच्या तुलनेत ३% वर गेला आहे.

चिनी रेनमिनबी मागच्या वर्षात डॉलरच्या तुलनेत ०.४% ने घसरला आहे.

भारताच्या आर्थिक वृद्धीमध्ये अपेक्षेपेक्षा तीव्र घसरण होणे हे भारतीय रुपयाच्या खराब कामगिरीचे कारण असल्याचे तज्ञ मानतात.

“चलनाची मजबूती आणि देशाची आर्थिक वृद्धी यांच्यामध्ये घट्ट नाते असते. भारताच्या जीडीपीच्या वृद्धीमध्ये इतर देशांच्या तुलनेत खूप मोठी घसरण झाल्यामुळे चलनावर नकारात्मक दबाव आला,” असे इक्विनॉमिक्स रीसर्च अँड ऍडवायजरी सर्व्हिसेसचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक जी. चोक्कालिंगम म्हणतात.

त्यांच्या मते २०१९ या कॅलेंडर वर्षात इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये २० अब्ज डॉलर इतक्या किंमतीचे परकीय भांडवल आलेली असूनही भारतीय रुपया घसरला आहे. “हे भांडवल आल्याने रुपयावरचा दबाव थोडा कमी झाला आहे. उदाहरणार्थ २००८ मध्ये लेहमन क्रायसिसनंतर भारताच्या आर्थिक वृद्धीमध्येही मोठी घसरण झाली तेव्हा रुपया जवळजवळ २०% ने घसरला होता,” ते पुढे म्हणाले.

मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॉर्पोरेट करामध्ये कपात झाल्यानंतर भारतात येणारा भांडवलाचा प्रवाह सुधारला आणि त्यामुळे स्टॉकच्या किंमतीतही वाढ झाली.

बांगलादेश टका भारतीय रुपयाच्या मानाने चांगली कामगिरी करत आहे. पाकिस्तानी रुपयाची कामगिरी सर्वात खराब आहे आणि तो मागच्या १२ महिन्यात ९.५% ने खाली घसरला आहे. त्याची किंमत सध्या १५४.४ रुपये प्रति डॉलर आहे, जी एक वर्षापूर्वी १३९.८ रुपये प्रति डॉलर होती. दक्षिण कोरियाच्या वॉनची किंमत डॉलरच्यातुलनेत ५% ने घसरली आहे. त्याचा विनिमय दर सध्या १,१६७.१ वॉन प्रति डॉलर असा आहे.

भारताची अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर मागच्या वर्षीच्या ६.८% च्या तुलनेत आर्थिक वर्ष १९-२० मध्ये ५% असेल अशी अपेक्षा आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक डेटाबेसनुसार कोणत्याही मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेमधली ही सर्वात तीव्र घसरण आहे.

या डेटामध्ये हाँग काँग आणि सिंगापूर या उच्च उत्पन्न असलेल्या व्यापार-संवेदनशील शहर राष्ट्रांचाही समावेश आहे. हाँग काँगमध्ये चिनी राजवटीच्या विरोधात सध्या चाललेल्या आंदोलनांमुळे आर्थिक क्रियांना खीळ बसली आहे तर सिंगापूरला अमेरिका-चीनच्या व्यापार युद्धामुळे जागतिक व्यापारच कमी झाल्याचा फटका बसला आहे.

नवीनतम आशियाई देशांमध्ये फक्त पाकिस्तानमध्ये आर्थिक वृद्धीदरामध्ये भारतापेक्षा जास्त घसरण होण्याची शक्यता आहे. IMF नुसार पाकिस्तानचा आर्थिक वृद्धीदर कॅलेंडर वर्ष २०१८ मध्ये ५.५% होता तो २०१९ मध्ये ३.३% होण्याची अपेक्षा आहे.

दक्षिणपूर्व आशियातील बाकी देशांमध्ये वृद्धीदरात फारशी घसरण होणार नाही. उदा. इंडोनेशियाची अर्थव्यवस्था २०१९ मध्ये ५% ने वाढेल, जी मागच्या वर्षीच्या तुलनेत १४ बेसिस पॉइंट्सने कमी आहे (एक बेसिस पॉइंट म्हणजे एक शतांश टक्के).फिलिपिन्समध्ये वृद्धी दरातील बदल -५० बेसिस पॉइंट्स, विएतनाममध्ये -२०, चीनमध्ये -४०, बांगलादेशमध्ये -१० आणि दक्षिण कोरियामध्ये ७० बेसिस पॉइंट्स असेल.

२०१८ मध्येही भारतीय रुपयाच्या दरात ८% घसरण झाली होती. त्यामुळे मागच्या ५ वर्षांपैकी ४ वर्षांमध्ये आणि मागच्या १० वर्षांपैकी ८ वर्षांमध्ये रुपयाचा दर घसरला आहे.

मूळ बातमी

बिझिनेस स्टॅंडर्डच्या सौजन्याने.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0