सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला

सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला

नवी दिल्लीः अयोध्या खटल्यावरील लिहिलेल्या सनराइज ऑफ अयोध्या (Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times) पुस्तकात हिंदुत्वाची तुलना कट्टरवादी इस्ला

“मोहब्बत करनेवाला जा रहा है..”
गोव्याचा चित्तथरारक वाङ्मयीन इतिहास
टोकियो पॅराऑलिम्पिकः भाविनाबेन, निषाद कुमारला रौप्य

नवी दिल्लीः अयोध्या खटल्यावरील लिहिलेल्या सनराइज ऑफ अयोध्या (Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times) पुस्तकात हिंदुत्वाची तुलना कट्टरवादी इस्लामिक संघटनांशी केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर सोमवारी हल्ला केला. या हल्ल्यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घराला आगही लावण्याचा प्रयत्न झाला. खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. कुंड्यांही फोडण्यात आल्या. आपल्या घराचे नुकसान झालेली छायाचित्रे व व्हीडिओ खुद्ध खुर्शीद यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केले. यात दोन व्यक्ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारलेली नाही. हा हल्ला झाला तेव्हा खुर्शीद व त्यांचे कुटुंबिय घरात नव्हते.

खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयसिस व बोको हराम या कट्टर दहशतवादी संघटनांशी केल्याने त्यांच्यावर कट्टरवादी हिंदू संघटना व भाजपने टीका केली होती.

पोलिसांनी या प्रकरणी राकेश कपिल याच्यासह २० समाजकंटकांना अटक केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0