सांगली-कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती कायम

सांगली-कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती कायम

कोल्हापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी असलेली स्थिती. ........... सांगली-कोल्हापूर – सततचा पाऊस, नद्यांची वाढलेली पातळी आणि आलमट्टी ध

पूरग्रस्तांसाठी ६ हजार कोटींची मागणी
‘सांगली पूरग्रस्तांना पॅकेज नाही पण सर्व मदत मिळेल’
कोल्हापूर, सांगलीत महापूर : हजारो नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी असलेली स्थिती.

………..

सांगली-कोल्हापूर – सततचा पाऊस, नद्यांची वाढलेली पातळी आणि आलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा यांमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर पातळीवर आजही आहे.

कोयना धनातून ६९ हजार क्युसेक्स, राधानगरी धरणातून ७३०० क्युसेक्स, अलमट्टी धरणातून ३ लाख ८० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यांमधील बहुतांशी रस्ते बंद आहेत. राज्य परिवहन महामंडळाची सेवा आणि रेल्वे सेवा बंद असून, प्रवासी ठिकठीकाणी अडकले आहेत.

पंचगंगा नदीची पातळी घटली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरु असून, शिरोळ तालुक्यामध्ये परिस्थिती भीषण आहे. सांगलीमध्ये पाऊस कमी झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या २३० गावांमधून सुमारे १ लाख लोकांना स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती, प्रशासनाकडून देण्यात आली.

कोल्हापूरमध्ये मुस्लीम बोर्डिंगमध्ये लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. व्हिडिओ – अभिजित गुर्जर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: