नवी दिल्लीः शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट, अलिबाग येथील भूखंड ईडीने जप्त केले आहेत. ईडीने कोणतीही नोटीस न पा
नवी दिल्लीः शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट, अलिबाग येथील भूखंड ईडीने जप्त केले आहेत. ईडीने कोणतीही नोटीस न पाठवता आपल्या संपत्तीवर जप्ती आणल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. मराठी माणसावर अमराठींचा हा हल्ला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आम्ही कष्टातून जमीन खरेदी केली होती. दादरमधील फ्लॅटमध्ये माझे कुटुंबिय राहात होते. दादरच्या फ्लॅटवर ५५ लाख रु.चे कर्ज आहे, त्याची संपूर्ण माहिती राज्यसभा कार्यालयाला पूर्वीच दिली आहे. तरीही कोणतीही नोटीस न देता आपल्यावर कारवाई केल्याचा आरोप राउत यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ३० वर्षे आपण काम केले. आपल्या धमन्यात शिवसेनेचे लढाऊ रक्त असून आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नसल्याचे राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले.
हे दबावाचे राजकारण आहे. मी घाबरलेलो नाही, आपण यात दोषी आढळल्यास सर्व संपत्ती भाजपच्या नावाने दान करू असेही राऊत म्हणाले. किरीट सोमय्या हा महाराष्ट्रद्वेष्टा माणूस आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो, तो आम्हाला अक्कल शिकवणार का, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. ईडीची ही कारवाई सूडबुद्धीने करत आहे. ईडीने जप्त केलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ एक एकरही नसेल. आमच्या नातेवाईकांनी अधिकृत पैशांतून या जमिनी खरेदी केल्या होत्या. यामध्येही ईडीला आता आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला आहे. ईडीने माझं राहतं घरही जप्त केले आहे. यामुळे भाजपच्या लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजपचे लोक फटाके वाजवत आहेत. मराठी माणसाचा हक्काचा फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. या सगळ्याविषयी मला आनंद वाटतो. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
COMMENTS