नियम मोडल्याने संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनल निलंबित

नियम मोडल्याने संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनल निलंबित

नवी दिल्ली: लोकसभा आणि राज्यसभेतील कार्यवाहीचे थेट प्रसारण करणाऱ्या संसद टीव्हीचे यूट्यूब अकाउंट यूट्यूबच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्

माध्यान्ह भोजनाची बातमी देणाऱ्या पत्रकाराचा उत्तर प्रदेशात मृत्यू
सरकारविरोधात काश्मीरातील सर्व पक्ष एकवटले
‘स्वतःमध्ये बदल करण्याची काँग्रेसची इच्छा नाही’

नवी दिल्ली: लोकसभा आणि राज्यसभेतील कार्यवाहीचे थेट प्रसारण करणाऱ्या संसद टीव्हीचे यूट्यूब अकाउंट यूट्यूबच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थांबवण्यात आले आहे. यूट्यूब ‘सुरक्षिततेला निर्माण झालेल्या धोक्याचे’ निवारण करत आहे असा दावा वाहिनीने केला आहे.

वेबसाइटवर वाहिनीचे अधिकृत व्हिडिओ उपलब्ध नाहीत आणि त्याऐवजी “धिस अकाउंट इज टर्मिनेटेड फॉर व्हायोलेटिंग यूट्यूब्ज कम्युनिटी गाइडलाइन्स” असा संदेश येत आहे, अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली.

हे चॅनल हॅक करण्यात आल्याची आणि त्याचे नामकरण ‘एथेरिअम’ असे करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर नंतर सुरू होती. एथेरिअम हे एक क्रिप्टो चलन आहे.

संसद टीव्ही यूट्यूब अकाउंटवर ४०४ एरर दिसत होतो आणि ‘थिस पेज इजण्ट अव्हलेबल. सॉरी अबाउट दॅट. ट्राय सर्चिंग फॉर समथिंग एल्स’ असा मेसेज येत होता.

ही वाहिनी घोटाळेबाजांनी ताब्यात घेतली आहे असे अधिकृत निवेदन टीव्ही वाहिनीने १५ फेब्रुवारी रोजी पहाटे एकच्या सुमारास दिले. वाहिनीच्या सोशल मीडिया टीमने अकाउंट पहाटे पावणेचारच्या सुमाराला हे चॅनल रिस्टोअर करण्यात आल्याचे सहसचिव पुनीत कुमार यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनेही (सीईआरटी-इन) चॅनल ताब्यात घेतल्याचे कळवल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले. यूट्यूबने ‘सुरक्षिततेला निर्माण झालेल्या धोक्यांचे’ कायमस्वरूपी निवारण सुरू केले आहे आणि लवकरात लवकर चॅनल रिस्टोअर होईल असेही यात म्हटले आहे.

चॅनल ताब्यात घेऊन किंवा अन्य कोणत्या मार्गाने, यूट्यूबच्या नेमक्या कोणत्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यूट्यूबच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणत्या प्रकारच्या आशयाला (कॉण्टण्ट) यूट्यूबवर परवानगी नाही हे अधोरेखित करण्यात आले आहे आणि ही तत्त्वे सर्वांना समान पद्धतीने लागू होतात. कॉण्टेण्टचा विषय किंवा चॅनलच्या क्रिएटरची पार्श्वभूमी, राजकीय विचारसरणी, हुद्दा किंवा संलग्नता याचा विचार केला जात नाही.

स्पॅम किंवा फसव्या पद्धती, संवेदनशील मजकूर, छळ किंवा सायबरबुलिंग किंवा घातक कॉण्टेण्ट, द्वेषपूर्ण भाषणे, नियंत्रित घटक आणि चुकीची माहिती या कारणांमुळे चॅनल थांबवले जाऊ शकते.

प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला यूट्यूबची मालक कंपनी गुगलने अद्याप उत्तर दिलेले नाही.

भारत सरकारशी संबंध असलेल्या ऑनलाइन अकाउंट्सचे कथित क्रिप्टो हॅकिंग होण्याची ही पहिली वेळ नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हॅण्डल “अगदी थोड्या काळासाठी” ताब्यात घेण्यात आले होते अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने १२ डिसेंबर रोजी दिली होती. हे अकाउंट हॅक करून त्यावरून क्रिप्टोकरन्सी साइटची लिंक ट्विट करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

सप्टेंबर २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिगत वेबसाइटचे अकाउंटही हॅक करण्यात आले होते, असे ट्विटरने सांगितले. या अकाउंटद्वारे क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पंतप्रधान मदत निधीला देणगी द्या असे आवाहन करण्यात आले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0