शाह फैसल पुन्हा प्रशासकीय सेवेत रूजू

शाह फैसल पुन्हा प्रशासकीय सेवेत रूजू

श्रीनगरः २०१९मध्ये देशात असहिष्णुता वाढत असल्याचे कारण देत भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत काश्मीरमध्ये नवा राजकीय पक्ष स्थापन करणारे माजी आयएएस

अमेरिकेला शह देणारे तेलयुद्ध
कोरोनावरच्या औषधाचा दावाच नव्हताः पतंजली
‘सुल्ली डील्स’अॅप बनवणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक

श्रीनगरः २०१९मध्ये देशात असहिष्णुता वाढत असल्याचे कारण देत भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत काश्मीरमध्ये नवा राजकीय पक्ष स्थापन करणारे माजी आयएएस अधिकारी शाह फैसल यांना पुन्हा सरकारी सेवेत सामावून घेण्यात आले आहे. शाह फैसल यांचा राजीनामा जम्मू-काश्मीर सामान्य प्रशासन खात्याने मंजूर केला नव्हता अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली. फैसल आता आपल्याला कोणत्या खात्याचे पद मिळेल याच्या प्रतिक्षेत आहेत. पण इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शाह फैसल यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेत परत येण्याच्या निर्णयाला केंद्रीय गृहखात्याने परवानगी दिल्याने ते दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये रुजू होतील असे सांगितले जात आहे.

२०१९मध्ये देशातील वाढती असहिष्णुता पाहून फैसल यांनी आयएएस पदाचा राजीनामा दिला होता व त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला होता. २०१९मध्ये जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्यानंतर फैसल यांना काही दिवस नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पण त्यांची लगेच सुटका झाली होती.

गेल्या २७ एप्रिलला फैसल यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी, जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०१९ या ८ महिन्यांनी माझ्या जीवनावर एवढा दबाव टाकला की त्यामुळे मी संपलो होतो. या काळात एका आभासी परिकल्पनेचा पाठलाग करत आजपर्यंत जे काही मी मिळवले होते ते हरवत चाललो होतो. नोकरी, मित्र, प्रतिष्ठा, सार्वजनिक सद्भावना गमावल्या. माझ्या आदर्शवादाने मला या काळात निराशा दिली. पण माझा स्वतःवर विश्वास होता व झालेल्या चुका दुरुस्त करण्याची मी तयारी दाखवली. आपले आयुष्य आपल्याला सुधारण्याची दुसरी संधी देते. ते ८ महिने मी विसरण्याचा प्रयत्न करत आहे, त्या काळातील आठवणी मी पुसण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वतःला अजून एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी मी ३९ वर्षे पूर्ण केली असतील व जगण्यासाठी नव्या ऊर्जेने तयार आहे, असे म्हटले आहे.

शाह फैसल पुन्हा सरकारी सेवेत येत असल्याचे अंदाज सर्वांनाच होते. ते जम्मू-काश्मीरच्या उप-राज्यपालांचे सल्लागारपदी येतील अशा अटकळी होत्या.

शाह फैसल हे २००९च्या केंद्रीय नागरी सेवा परीक्षांमध्ये भारतातून पहिले आले होते. त्यांना जम्मू व काश्मीर काडर मिळाले होते. आपल्या १० वर्षांच्या सेवेत त्यांनी राज्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. २०१८मध्ये त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या केनेडी स्कूलमध्ये एडवर्ड मेसन फेलो म्हणून निवडण्यात आले होते. त्या नंतर ते सेवेत रुजू झाले होते. पण २०१९मध्ये अचानक त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत जम्मू व काश्मीर पीपल्स मुव्हमेंट नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकही लढण्याचा इरादा बोलून दाखवला होता.

पण २०२०मध्ये त्यांनी आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय ते पुन्हा सरकारी सेवेत रुजू होण्याचा संकेत होता. त्यांनी केंद्र सरकारविरोधातले ट्विटही हटवले होते. त्यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या धोरणांचे समर्थन करण्यास सुरूवात केली. ते आपल्या ट्विटर अकाउंटवर मोदी व शहा यांची अनेक भाषणे, विधाने व घोषणा शेअर करत होते. त्यांनी वादग्रस्त काश्मीर फाइल्स या चित्रपटाचेही समर्थन केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0