भाजप आयटी सेलला शाहीन बागची १ कोटीची मानहानी नोटीस

भाजप आयटी सेलला शाहीन बागची १ कोटीची मानहानी नोटीस

नवी दिल्ली : गेले महिनाभर नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग परिसरात महिलांचे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत खोटी माहिती पसर

हाथरस तरुणीचा फोटो ट्विटरवर : भाजप आयटी सेलचा प्रताप
कोविडच्या दुसऱ्या लाटेत भाजपच्या ९ नेत्यांची मुक्ताफळे
‘राज्य निवडणूक आयोगाचे काम भाजपच्या आयटी सेलकडे’

नवी दिल्ली : गेले महिनाभर नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग परिसरात महिलांचे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करत भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.

शाहीन बाग परिसरात आंदोलनात उपस्थिती दाखवावी यासाठी महिलांना प्रतिदिन ५०० रुपये दिले जातात असा आरोप करणारा एक व्हिडिओ भाजपच्या आयटी सेलने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओच्या विश्वासार्हतेवर त्यावेळी प्रश्न उपस्थित झाले होते पण भाजपने हा व्हिडिओ मागे घेतला नाही. त्यात या व्हिडिओवर गेले महिनाभर कुडकुडणाऱ्या थंडीत आपल्या लहान मुलांनासोबत घेऊन आंदोलन करणाऱ्या शेकडो महिला नाराज झाल्या होत्या. या नाराजीची दखल घेत वकील महमूद पारचा यांनी अमित मालवीय यांना एक कोटी रु.चा मानहानीचा आरोप करणारी नोटीस पाठवली.

ही नोटीस जाकीर नगरमधील नफीसा बानो व शाहीन बागेतील शहजाद फातमा यांच्यावतीने मालवियांना पाठवण्यात आली आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाजपने खोटे व्हिडिओ तयार केले असा या महिलांचा आरोप आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0