पवारांच्या घरावरील हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध

पवारांच्या घरावरील हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. ९ एप्रिलला शरद पवारांच्

अफगाणिस्तानात सर्वच धर्मांची होरपळ – हमीद करझाई
रिजिजूंच्या चकमा-हाजोंग विधानावरून अरुणाचलमध्ये गदारोळ
लाल चौकः जखमी काश्मिरचे सत्यचित्र

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला.

९ एप्रिलला शरद पवारांच्या निवासस्थानी जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांना जबाबदार धरत त्यांच्या घराच्या दिशेने चपला भिरकावल्या. पोलिसांनी कारवाई करत १०९ आंदोलक कर्मचारी आणि आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. सदावर्तेंना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून इतर आंदोलकांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री यांनी जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. “परवा साहेबांच्या (शरद पवार) घरी हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. त्यांनी शरद पवारांच्या घराची रेकी केली होती. त्यांना शरद पवारांना शारिरीक इजा करायची होती. महाराष्ट्राचं नशीब असं काही घडलं नाही”, असे आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संशय व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलकांच्या मागे कोणतीतरी शक्ती होती. हा प्रकार म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

“या घटनेबाबत खूप काही कानावर आले आहे. पण त्याबाबत वास्तव परिस्थिती समोर आल्याशिवाय बोलण योग्य ठरणार नाही. जे कुणी आले होते, ते सगळे सुस्थितीत होते, अशातला भाग नाही. काही वेगळ्या गोष्टी देखील तिथे घडत होत्या”, असे अजित पवार म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. “राज्याचे मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहेत. ते समजुतदार आहेत. खुद्द शरद पवार एक प्रतिष्ठित नेते आहेत. त्यामुळे या प्रकारची घटना कुणीही चांगली म्हणणार नाही. अशा प्रकारची घटना होऊ नये, असं मला वाटते. त्यासाठी आमचे राज्य सरकार लक्ष देईल”, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.

पुणे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोर रविवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, आबा बागुल, भीमराव पाटोळे, अविनाश बागवे आदींसह नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0