भाजप सेना एकत्रच

भाजप सेना एकत्रच

मुंबई : भाजप-शिवसेना व अन्य मित्रपक्षांच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला असून भाजप १६४ तर शिवसेना १२४ जागांवर निवडणूक लढवणार आहे तर अन्य १८ जागा मित्र

आसाम घोटाळा: आरोग्यमंत्र्यांशी संबंधित कंपन्यांचे उखळ पांढरे
अजित पवारांच्या पाठींब्यातून मजबूत सरकार देणार : फडणवीस
भाजप नेत्याच्या फार्महाऊसमधून सहा अल्पवयीनांची सुटका

मुंबई : भाजप-शिवसेना व अन्य मित्रपक्षांच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला असून भाजप १६४ तर शिवसेना १२४ जागांवर निवडणूक लढवणार आहे तर अन्य १८ जागा मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान मंगळवारी भाजपने आपल्या १२५ तर शिवसेनेने आपल्या ७० उमेदवारांची नावे जाहीर केली.

भाजपच्या यादीत विद्यमान ५२ आमदारांना तर १२ महिलांना संधी दिली असून १२ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे. पुण्यातील शिवाजीनगरमधून विजय काळे, मुलुंडमधून सरदार तारासिंग, बीड जिल्ह्यातील माजलगावमधून ए टी देशमुख, दक्षिण नागपूरमधून आमदार सुधाकर कोहळे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

कोथरूडमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमदार कालिदास कोळंबरकर यांना वडाळ्यातून तिकीट मिळालेले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे व विनोद तावडे यांची नावे नाहीत. पण खडसे यांनी मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. माझे पक्षाच्या यादीत नाव येईल अशी अपेक्षा आहे. पण नाव आले नाही तर नाथाभाऊंचा गुन्हा काय, ४२ वर्षे पक्षाची सेवा करणे हा गुन्हा असा प्रश्न त्यांनी भाजपला उद्देशून केला.

तर काँग्रेसचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला. ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे ७० उमेदवार जाहीर

दरम्यान, भाजपपाठोपाठ शिवसेनेने ७० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, यामध्ये प्रामुख्याने वरळीतून शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे, नालासोपाऱ्यात चकमेकफेम प्रदीप शर्मा यांची नावे आहेत. शिवाय काही नवे चेहरे आहेत. यात भायखळ्यातील नगरसेविका यामिनी जाधव यांच्यासह, गोवंडीतून विठ्ठल लोकरे, अंधेरी पूर्वेतून रमेश लटके आणि मुंबादेवीतून पांडुरंग सकपाळ यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधून उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीला रामराम करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांना बीडमधून तर राष्ट्रवादीतूनच आलेल्या भास्कर जाधव यांना गुहागरमधून तिकीट देण्यात आलं आहे. शिवसेनेने या यादीत अखिल भारतीय सेना आणि अर्जुन डांगळे यांच्या रिपब्लिकन जनशक्तीला एकही जागा सोडलेली नाही.

भाजपची यादी :

नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस, कोथरूड – चंद्रकांत पाटील,  नंदूरबार – विजयकुमार गावित, नवापूर – भारत गावित, रावेर – हरीभाऊ जावळे, भुसावळ – संजय सावकारे, अकोला (प.) – गोवर्धन शर्मा,  अकोला (पू.) – रणधीर सावरकर, जामनेर – गिरीश महाजन, जळगाव जामोद – संजय कुटे, शहादा – राजेश पडवी, जळगाव शहर – सुरेश भोळे, सिंदखेडा – जयकुमार रावल, धुळे ग्रामीण – ज्ञानज्योती बदाणे, अमळनेर – शिरीष चौधरी, चाळीसगाव – मंगेश चव्हाण, माण – जयकुमार गोरे, तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील, अकोले – वैभव पिचड, राहुरी – शिवाजीराव कर्डिले, औसा – अभिमन्यू पवार, वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, नाशिक मध्य – देवयानी फरांदे, ऐरोली – संदीप नाईक, शिर्डी – राधाकृष्ण विखे-पाटील, इंदापूर – हर्षवर्धन पाटील, अमरावती – सुनील देशमुख, वर्धा – पंकज भोयर, मूर्तिजापूर – हरीश पिंपळे, पुणे कँटोन्मेंट – सुनील कांबळे, वाशिम – लखन मलिक, कारंजा – राजेंद्र पटणी, दर्यापूर – रमेश बुंदिले, मोर्शी – डॉ. अनिल बोंडे, आर्वी – दादाराव केंचे, हिंगणघाट – समीर कुणावार, नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे, उमरेड – सुधीर पारवे, हिंगणा – समीर मेघे, राजुरा – संजय धोत्रे, आमगाव – संजय पूरम, मलकापूर – चैनसुख संचेती, चिखली – श्वेत महाले, खामगाव – आकाश फुंडकर, अकोट – प्रकाश भारसाकळे, सावनेर – राजीव पोतदार, नागपूर दक्षिण – मोहन मते, नागपूर मध्य – विकास कुंभारे, नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख, नागपूर उत्तर – मिलिंद माने, अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले, तिरोरा – विजय रहांगदले, आरमोरी – कृष्णा गजभे, गडचिरोली – देवराव होली, चंद्रपूर – नाना शामकुळे, बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, चिमूर – कीर्तीकुमार भांगडिया, वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार, राळेगाव – अशो उइके, यवतमाळ – मदन येरावार, आर्नी – संदीप धुर्वे, भोकर – बापुसाहेब गोर्ठेकर, मुखेड – तुशार राठोड, हिंगोली – तानाजी मुटकुळे, परतूर – बबनराव लोणीकर, बदनापूर – नारायण कुचे, भोकरदन – संतोष दानवे-पाटील, फुलंब्री – हरीभाऊ बागडे, औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, परळी – पंकजा मुंडे, गंगापूर – प्रशांत बम, चांदवड – राहुल आहेर, नाशिक पश्चिम – सीमा हिरे, डहाणू – पास्कल धनारे, विक्रमगड – हेमंत सावरा, भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, मुरबाड – किसन कथोरे, कल्याण पूर्व – गणपत गायकवाड, डोंबिवली – रवींद्र चव्हाण, मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता, ठाणे – संजय केळकर, दहिसर – मनीषा चौधरी, मुलुंड – मिहीर कोटेचा, कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर, चारकोप – योगेश सागर, घाटकोपर (प.) – राम कदम, गोरेगाव – विद्या ठाकूर, विलेपार्ले – पराग अळवणी, सायन कोळीवाडा – तामीळ सेल्वन, वडाळा (मुंबई) – कालिदास कोळंबकर, मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, बेलापूर – मंदा म्हात्रे, पनवेल – प्रशांत ठाकूर, पेण – राजीवशेठ पाटील, शिरूर – बाबुराव पाचर्णे, चिंचवड – लक्ष्मण जगताप, पुणे पर्वती – माधुरी मिसाळ, कसबा पेठ – मुक्ता टिळक, भोसरी – महेश लांडगे, वडगाव शेरी – जगदीश मुळीक, शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे, खडकवासला – भीमराव तापकिर, हडपसर – योगेश टिळेकर, कोपरगाव – स्नेहलता कोल्हे, सातारा- शिवेंद्रराजे भोसले, कराड दक्षिण – अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष), नेवासा – बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव – मोनिका राजळे, श्रीगोंदा – बबनराव पाचपुते, कर्जत जामखेड – राम शिंदे, गोराई – लक्ष्मण पवार, माजलगाव – रमेश अडसकर, अष्टी – भीमराव धोंडे, अहमदपूर – विनायक किसन जाधव-पाटील, निलंगा – संभाजी पाटील-निलंगेकर, सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख, सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, वाई – मदन भोसले, कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक, इचलकरंजी – सुरेश हाळवणकर, मिरज – सुरेश खाडे, सांगली – सुधीर गाडगीळ, शिराळा – शिवाजीराव नाईक, जत – विलासराव जगताप, अंधेरी पश्चिम – अमित साटम.

शिवसेनेची यादी

नांदेड – राजश्री पाटील, मुरुड – महेंद्र दळवी, हादगाव – नागेश पाटील अष्टीकर, मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ, भायखळा – यामिनी जाधव, गोवंडी – विठ्ठल लोकरे, एरंडोल पारोळा – चिमणराव पाटील, वडनेरा – प्रीती संजय, श्रीवर्धन – विनोद घोसाळकर, कोपर पाचपाखाडी – एकनाथ शिंदे, वैजापूर – रमेश बोरनावे, शिरोळ – उल्हास पाटील, गंगाखेड – विशाल कदम, दापोली – योगेश कदम, गुहागर – भास्कर जाधव, अंधेरी पूर्व – रमेश लटके, कुडाळ – वैभव नाईक, ओवळा माजीवाडा – प्रताप सरनाईक, बीड – जयदत्त क्षीरसागर, पैठण – संदीपान भुमरे, शहापूर – पांडुरंग बरोला, नागपूर शहर – अनिलभैय्या राठोड, सिल्लोड – अब्दुल सत्तार, औरंगाबाद (दक्षिण) – संजय शिरसाट, अक्कलकुवा – आमिशा पाडवी, इगतपुरी – निर्मला गावित, वसई – विजय पाटील, नालासोपारा – प्रदीप शर्मा, सांगोला – शब्जी बापू पाटील, कर्जत – महेंद्र थोरवे, घनसावंगी – डॉ.हिकमत दादा उधन, खानापूर – अनिल बाबर, राजापूर – राजन साळवी, करवीर – चंद्रदीप नरके, बाळापूर – नितीन देशमुख, देगलूर – सुभाष सबणे, उमरगा लोहारा – ज्ञानराज चौगुले, दिग्रस – संजय राठोड, परभणी – डॉ. राहुल पाटील, मेहकर – डॉ. संजय रेमुलकर, जालना – अर्जुन खोतकर, कळमनुरी – संतोष बांगर, कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर, औरंगाबाद (पश्चिम) – संजय शिरसाट, चांदगड (कोल्हापूर) – संग्राम कुपेकर, वरळी – आदित्य ठाकरे, शिवडी – अजय चौधरी, इचलकरंजी – सुजीत मिकानेकर, राधानगरी – प्रकाश आबिटकर, पुरंदर – विजय शिवतारे, दिंडोशी – सुनील प्रभू, जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर, मागाठणे – प्रकाश सुर्वे, गोवंडी – विठ्ठल लोकारे, विक्रोळी – सुनील राऊत, अणुशक्ती नगर – तुकाराम काटे, चेंबूर – प्रकाश फतारपेकर, कुर्ला – मंगेश कुडाळकर, कलिना – संजय पोतनीस, माहीम – सदा सरवणकर, जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, पाचोरा – किशोर पाटील, मालेगाव – दादा भुसे, सिन्नर – राजाभाऊ वाजे, निफाड – अनिल कदम, देवळाली – योगेश घोलप, खेड – आळंदी – सुरेश गोरे, पिंपरी चिंचवड – गौतम चाबुकस्वार, येवला – संभाजी पवार, नांदगाव – सुहास खांडे.

मनसेची २७ उमेदवारांची यादी जाहीर

भाजप-सेनेबरोबर मंगळवारी मनसेनेही आपल्या २७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात नरेंद्र धर्मा पाटील यांना सिंदखेडामधून, प्रमोद पाटील यांना कल्याण ग्रामीण, प्रकाश भोईर यांना कल्याण पश्चिम, संदीप देशपांडे यांना माहीम, मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे नेते गजानन काळे यांना बेलापूर, कसबा पेठेतून मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, हडपसरमधून पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, कोथरूडमधून वकील किशोर शिंदे व शिवाजीनगरमधून सुहास निम्हण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: