स्विमिंग सूट फोटो : प्राध्यापिकेवर ९९ कोटींचा प्रतिमा हननचा दावा

स्विमिंग सूट फोटो : प्राध्यापिकेवर ९९ कोटींचा प्रतिमा हननचा दावा

कोलकाताः येथील सेंट झेवियर्स विद्यापीठातील एका महिला प्राध्यापिकेने स्वीमिंग सूट घालून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या अकाउंटवर फोटो ट

आमार कोलकाता – भाग ४ : ८५ अँमहर्स्ट स्ट्रीट
सीआरपीएफचा गोळीबार हे हत्याकांडः ममतांचा आरोप
ममता- राज्यपाल धनखड मतभेद चिघळले; ट्विटरवर ब्लॉक

कोलकाताः येथील सेंट झेवियर्स विद्यापीठातील एका महिला प्राध्यापिकेने स्वीमिंग सूट घालून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या अकाउंटवर फोटो टाकल्याने गदारोळ माजला आहे. या प्राध्यापिकेचा फोटो एक विद्यार्थी पाहात असताना त्याच्या  वडिलांनी ते पाहिले आणि मुलांवर अशा फोटोमुळे वाईट परिणाम होतात अशी तक्रार त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली. या तक्रारीनंतर प्राध्यापिकेला आपल्या नोकरीचा राजीनामाही द्यावा लागला होता. पण बुधवारी सेंट झेवियर्स विद्यापीठ प्रशासनाने या प्राध्यापिकेकडून आपल्या विद्यापीठाची प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत ९९ कोटी रु.ची नुकसान भरपाई मागितली आहे.

आता या प्रकरणावरून सोशल मीडियावरील खासगी आयुष्याच्या स्वातंत्र्याबद्दल, प्रदर्शनाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्राध्यापिकेने इन्स्टाग्रामवरचे तिचे अकाउंट हॅक करून फोटोंचा स्क्रीन शॉट कुणीतरी सार्वजनिक केल्याचा आरोप केला आहे व ही एक प्रकारे लैंगिक छळवणूक असल्याचा दावा केला आहे. आपले फोटो विद्यापीठात नोकरी लागण्याआधीचे होते. ते फोटो रिल्समध्ये होते. हे फोटो २४ तासानंतर आपोआप डिलिट होता. त्यात आपले अकाउंट खासगी आहे, तरीही हे फोटो विद्यार्थ्याने कसे पाहिले, असा सवाल या प्राध्यापिकेचा आहे.

पण तक्रारदार व्यक्तीने या प्राध्यापिकेने मुद्दामहून स्वतःचे स्विमिंग सूटमधील फोटो सार्वजनिक केल्याचा आरोप केला आहे. एखादा शिक्षक स्वतःची अंतःवस्त्रे दाखवत सोशल मीडियावर फोटो प्रदर्शित करतो हे शरम आणणारे असून आपण आपल्या मुलाला या सर्वांपासून दूर ठेवले होते. तो आता १८ वर्षांचा झाला आहे, त्याने आपल्या शिक्षिकेचे अंतःवस्त्र घातलेले फोटो पाहणे हे अश्लिल व अयोग्य वाटत असल्याचे या तक्रारदाराने विद्यापीठाला पत्रात म्हटले आहे.

विद्यापीठाने या तक्रारीची लगेच दखल घेत प्राध्यापिकेला समज दिली. त्यावर प्राध्यापिकेने राजीनामाही दिला होता. पण आपल्या विरोधात संस्थेचे कुलगुरू, कुलसचिवांनी ‘कांगारू कोर्ट’ बसवले. धमक्या दिल्या, घाबरवले गेले, टीका टिप्पण्या केल्या, लैंगिक ताशेरेही मारले. त्या विरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे या प्राध्यापिकेने म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0