चंदीगडः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहणार्या जाहिराती पंजाब सरकारने वर्तमानपत्रात प्रसिद्ध न केल
चंदीगडः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहणार्या जाहिराती पंजाब सरकारने वर्तमानपत्रात प्रसिद्ध न केल्याने गदारोळ उडाला आहे. ३१ ऑक्टोबर १९८४मध्ये इंदिरा गांधी यांची शीख दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी पंजाबमधील चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केली आहे. भाजप देशाच्या पोलादी नेतृत्वाला इंदिरा गांधी यांना इतिहासातून मिटवण्याचा प्रयत्न करत आहे पण पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. सुनील जाखड यांनी गेल्या वर्षीच्या इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीला तत्कालिन अमरिंदर सिंह सरकारने इंदिरा गांधी यांच्या स्मृतींना आदरांजलीपर जाहिरात प्रसिद्ध केल्याची आठवण चन्नी सरकारला करून दिली.
काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणी समितीमध्ये एक स्थायी आमंत्रित सदस्य म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगदीश टाइटलर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या नियुक्तीवर नापसंती व्यक्त करत जाखड यांनी टाइटलर यांच्या नियुक्तीमुळे पंजाब सरकारने इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहणारी जाहिरात का प्रसिद्ध केली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
गेल्या महिन्यात अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर जाखड यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आले होते. ते प्रबळ दावेदार होते पण ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर पंजाब काँग्रेसमधील असंतुष्ट गट अधिक आक्रमक झाले आहेत.
टाइटलर यांच्यावर १९८४च्या शीख दंगलीत कथित सहभाग असल्याचा आरोप आहे. टाइटलर यांच्या नियुक्तीवर अकाली दल व भाजपक़डून टीका सुरू आहे. भाजपचे पंजाबमधील एक नेते तरुण चुघ यांनी काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांना टाइटलर यांच्या नियुक्तीवर प्रश्न विचारले आहेत.
मूळ बातमी
COMMENTS