‘ट्रॅक्टर रॅली’ संबंधित निर्णय पोलिसांनी घ्यावेत’

‘ट्रॅक्टर रॅली’ संबंधित निर्णय पोलिसांनी घ्यावेत’

नवी दिल्लीः शेतकरी संघटनांचा येत्या प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीचा विषय कायदा व सुव्यवस्थेशी निगडित असून राष्ट्रीय राजधानीत कोणाला प्रवेश

लखीमपुर खिरी प्रकरणातील साक्षीदारावर जीवघेणा हल्ला
दिल्ली-उ. प्रदेश सीमेवर आंदोलक-पोलिसांमध्ये तणाव
‘बाजार समित्या, हमी भाव बंद होणार नाही’

नवी दिल्लीः शेतकरी संघटनांचा येत्या प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीचा विषय कायदा व सुव्यवस्थेशी निगडित असून राष्ट्रीय राजधानीत कोणाला प्रवेश द्यायचा याचे सर्वाधिकार पोलिसांना असल्याचे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या ट्रॅक्टर रॅलीचा विषय हाताळण्याचे अधिकार पोलिसांना पूर्ण आहेत, त्यांनीच त्यावर अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखाली पीठाने स्पष्ट केले. या पीठामध्ये न्यायमूर्ती एलएन राव व न्या. विनीत सरीन हे दोन अन्य न्यायमूर्ती आहेत.

पोलिसांना त्यांचे काय अधिकार आहेत हे आम्ही सांगण्याची गरज आहे का? आम्ही त्यांचे अधिकार काय आहेत हे सांगत नाही पण ही रॅली हाताळण्याचे अधिकार त्यांच्याकडेच आहेत. यावर अटर्नी जनरलनी ही रॅली बेकायदा असून राजधानीत ५ हजार जणांचा जमाव येणे कायद्याचा भंग असल्याचे मत मांडले. त्यावर सरन्यायाधीशांनी पोलिसांना त्यांचे अधिकार राबवायचे स्वातंत्र्य आहे, असे स्पष्ट केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0