ऑस्करसाठी भारताकडून तामिळ चित्रपट ‘कुडांगल’

ऑस्करसाठी भारताकडून तामिळ चित्रपट ‘कुडांगल’

मुंबईः आगामी ९४ व्या ऑस्कर अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी भारताकडून तामिळ चित्रपट ‘कुडांगल’ पाठवण्यात येणार आहे. नवोदित दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा हा

पीएम केअर्स फंड : नागपूर खंडपीठाची केंद्राला नोटीस
देशाचा जीडीपी उणे २३.९ टक्के
हाथरस तरुणीचा फोटो ट्विटरवर : भाजप आयटी सेलचा प्रताप

मुंबईः आगामी ९४ व्या ऑस्कर अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी भारताकडून तामिळ चित्रपट ‘कुडांगल’ पाठवण्यात येणार आहे. नवोदित दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा हा पहिलाच चित्रपट असून एक व्यसनी पती त्याला सोडून गेलेल्या पत्नीच्या शोधात आपल्या छोट्या मुलाची मदत घेतो व तिला घरी आणण्याचे प्रयत्न करतो, अशी या चित्रपटाची कथा आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात ‘कुडांगल’ने ‘रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘टायगर’ पुरस्कार मिळवला होता. आता हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

या चित्रपटातील कलाकार चेल्लापांडी व करुतथडैया हे नवोदित आहेत. आमचा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडला जाईल हा सुखद धक्का असून गेल्या तीन वर्षांची आमची मेहनत फळास आल्याची प्रतिक्रिया विनोदराज यांनी दिली. आमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत व हा चित्रपट एक सरळ कथा आहे. ‘रॉटरडॅम’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आम्हाला पुरस्कार मिळेल अशी शक्यताही वाटत नव्हती. आता एक प्रवास सुरू झाला आहे, असे विनोदराज म्हणाले.

विनोदराज हे तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील मेलूर शहरानजीक एका गावात जन्माला आले. लहानपणापासून चित्रपट चित्रिकरणाच्या सेटवर जाण्याच्या आवडीतून ते चित्रपट निर्मितीकडे वळले. त्यांनी या व्यवसायात येण्याअगोदर चेन्नईमधील एका डीव्हीडी विक्रीच्या दुकानात काम केले होते. या नोकरीत त्यांचा आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी संबंध आले. पुढे काही दिग्दर्शकांच्या सोबत सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले.

‘कुडांगल’ या चित्रपटाची कथा त्यांनीच लिहिली आहे. २०१८मध्ये तामिळ अभिनेत्री नयनतारा व चित्रपट निर्माते विग्नेश शिवन यांच्यासोबत त्यांनी या चित्रपटाचे काम सुरू केले. आपल्या व्यक्तीगत आयुष्याशी निगडित अशी ‘कुडांगल’ची गोष्ट असल्याचे विनोदराज सांगतात.

विनोदराज यांच्या धाकट्या बहिणीचे नवर्याशी पटत नव्हते. त्या वादातून बहिणीने घर सोडले. तेव्हा तिच्या शोधासाठी बहिणीचा नवरा १४ किमी पाठलाग करत निघाला. ग्रामीण जीवनात जीवनाचा संघर्ष अत्यंत गुंतागुंतीचा आहे. दुष्काळ व बेरोजगारी या समस्यांमुळे लोकांचे जगणे अत्यंत असह्य असे झाले आहे. पितृसत्ताक पद्धतीमुळे स्त्रियांचे आयुष्य अधिक हलाखीचे, कष्टमय झाल्याचे विनोदराज यांचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0