आरोपामुळे वानखेडेंचीच एनसीबीकडून चौकशी

आरोपामुळे वानखेडेंचीच एनसीबीकडून चौकशी

मुंबईः आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला सोमवारी वेगळे वळण मिळाले. या प्रकरणाची चौकशी करणारे नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) तपास अधिकारी समीर वानखेडे

ड्रग्ज प्रकरणे हाताळण्याचा एनसीबी ‘पॅटर्न’
‘आर्यनने कट रचल्याचा एनसीबीकडे पुरावा नाही’
एनसीबीला “छाप्या”बाबत विचारले जावेत असे काही प्रश्न

मुंबईः आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला सोमवारी वेगळे वळण मिळाले. या प्रकरणाची चौकशी करणारे नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) तपास अधिकारी समीर वानखेडे यांचीच खंडणी घेतल्याच्या आरोपावरून एनसीबीकडून चौकशी होणार आहे.

सोमवारी एनसीबीचे उपमहानिरीक्षक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली दोन अधिकारी वानखेडे यांची खंडणीप्रकरणी चौकशी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आमची यंत्रणा एक निःष्पक्ष व स्वतंत्र असून या यंत्रणेतील एखाद्या अधिकार्यावर आरोप केले जात असतील तर त्याची चौकशी करण्यास आमची तयारी असते, असे सिंह म्हणाले. वानखेडे यांची चौकशी स्वतंत्र व निःष्पक्ष होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या घटनेनंतर वानखेडे दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. त्यांची मुंबईतून बदलीही होण्याची चर्चा सुरू झाली आहे. वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी खंडणीचे आरोप केल्याने वानखेडे यांना मुंबई पोलिसही चौकशीसाठी बोलावेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्यात वानखेडे यांच्यावर चर्चा झाली. या चर्चेचा संपूर्ण तपशील उघड झाला नाही. पण राज्य सरकार या प्रकरणात आपल्या पोलिस यंत्रणांना आणण्याचा विचार करत असल्याचे समजते.

साईल यांच्या आरोपामुळे वानखेडे अडचणीत

रविवारी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल यांनी आर्यन खान याच्या सुटकेसाठी बॉलिवूड अभिनेता शाह रुख खान यांच्याकडून २५ कोटी रु.ची मागणी वानखेडेंनी केली होती. या मागणीतील ८ कोटी रु. वानखेडे यांना मिळणार होते, असा खळबळजनक आरोप प्रसार माध्यमांपुढे केला होता. या आरोपामुळे वानखेडे अडचणीत आले होते.

प्रभाकर साईल हा या प्रकरणातील खासगी गुप्तहेर ज्याने आर्यन खान व अन्य काही तरुण एका क्रूझवर ड्रग्ज पार्टी करत असल्याची खबर एनसीबीला दिली होती व एनसीबीच्या प्रत्यक्ष छाप्यावेळी जो घटनास्थळी उपस्थित होता आणि त्याने आर्यन खान सोबत सेल्फीही काढली होती, त्या किरण गोसावीचा अंगरक्षक आहे.

फरार गोसावी लखनौत शरण येणार

दरम्यान प्रभाकर साईल यांनी सोमवारी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. तर फरार असलेले किरण गोसावी यांनी आपण लखनौमध्ये पोलिसांना शरण जात असल्याचे काही वृत्तवाहिन्यांना सांगितले. आपल्या जीवाला धोका असून संरक्षण हवे असल्याचेही ते म्हणाले. साईल यांच्याकडून झालेले सर्व आरोप बनावट व खोटे असून केवळ पैशासाठी आपल्यावर असे आरोप केले जात असल्याचे किरण गोसावी म्हणाले.

किरण गोसावी यांच्यावर महाराष्ट्रात काही प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील एका प्रकरणाबाबत आपण उ. प्रदेशात लखनौमध्ये शरण येत आहोत, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0